नेचर नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये तीन व्हिडीओ देण्यात आले आहेत. ज्यात ही महिला चित्त्यांसोबत दिसते आहे. हे वाचा - OMG! हत्तीसोबत Seesaw वर उभा राहिला तरुण; पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता महिला एका पार्कात आहे. तिच्या आजूबाजूला बरेच चित्ते आहेत. पहिल्या व्हिडीओत तिला चित्त्याला घट्ट धरल्याचं दिसतं आहे. ही महिला त्याच्या पाठीवरून हात फिरवते आहे आणि चित्ता शांत आहे. दुसऱ्या व्हिडीओत ही महिला चित्त्याच्या मानेवरून हात फिरवते आहे. जणू ती त्याला मसाज देते आहे आणि चित्ता डोळे बंद करून शांत बसून मसाजचा आनंद लुटतो आहे. हे वाचा - भक्तिरसात दंग झालं माकड, हातात करताल घेऊन करू लागलं भजन; पाहा VIDEO तिसरा व्हिडीओ पाहून तर तुम्हाला धडकीच भरेल. तिसऱ्या व्हिडीओत ही महिला चक्क चित्त्याला किस करते. यानंतर चित्ता तिच्याकडे आपलं तोंड करतो आणि तिच्या गालाला जिभेने चाटतो. तो आपल्या पद्धतीने प्रेम व्यक्त करतो.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking viral video, Tiger, Viral, Viral videos, Wild animal