साप हा धोकादायक आणि विषारी प्राण्यांपैकी एक आहे. मात्र असाही एक देश आहे जिथे एकही साप नाही. हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाचलं असेल मात्र ही गोष्ट खरी आहे. आयर्लंड येथे एकही साप आढळत नाही. या ठिकाणी साप नसण्यामागे गूढ असल्याचं सांगितलं जातं. सेंट पॅट्रिक नावाच्या संताने येथील साप समुद्रात फेकून दिले होते, असं म्हटलं जातं. ख्रिश्चन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी 40 दिवस उपाशी राहून हे काम केलं होतं. शास्त्रज्ञांच्या मते इथे कधीच साप नव्हते. जीवाश्म रेकॉर्थ विभागात आयर्लंडमध्ये सापांची नोंद नाही.