Home /News /viral /

लॉकडाऊनमध्ये गंगा इतकी स्वच्छ झाली की दिसले डॉल्फिन? काय आहे VIRAL VIDEO मागचं सत्य

लॉकडाऊनमध्ये गंगा इतकी स्वच्छ झाली की दिसले डॉल्फिन? काय आहे VIRAL VIDEO मागचं सत्य

लॉकडाऊनमध्ये माणसांचा वावर कमी झाल्यामुळे गंगेचं पात्र स्वच्छ झालं आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात दावा केला आहे की याठिकाणी पाण्यात विहार करणारे डॉल्फिन दिसू लागले आहेत.

    उमेश श्रीवास्तव, मेरठ, 29 एप्रिल : सोशल मीडियावर मेरठ शहरातील डॉल्फिन्सचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल देखील झाला आहे. सोशल मीडियावर असं बोललं जात आहे की, लॉकडाऊनमध्ये (Lockdown) गंगा नदी स्वच्छ झाल्याने याठिकाणी दिसणारे डॉल्फिन पुन्हा एकदा विहार करताना दिसू लागले आहेत. न्यूज18 च्या टीमने या व्हिडीओ मागची सत्यता पडताळून पाहिली. याकरता आम्ही मेरठमधील डीएफओ आदिति शर्मा यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी अशी माहिती मिळाली की हा व्हिडीओ गंगेमध्ये दिसलेल्या डॉल्फिन्सचाच आहे, मात्र तो वर्षभरापूर्वीचा आहे. (हे वाचा-कोलांटी उडी मारणारा हत्ती कधी पाहिलाय का? सोशल मीडियावर VIDEO व्हायरल) डीएफओ आदिती शर्मा यांनी माहिती दिली की, लॉकडाऊनमुळे गंगेचं पाणी नक्कीच स्वच्छ झाले आहे. शक्यतो स्वच्छ पाण्यातच डॉल्फिन दिसून येतात. आदिती पुढे म्हणाल्या की, नक्कीच आजकाल डॉल्फिन्सना शांततेमुळे आणि स्वच्छ पाण्यामुळे मस्त वाटत असेल. मासेमार पण त्यांना त्रास देण्यासाठी नाही आहेत. डॉल्फिन तसा लाजाळू मासा असल्यामुळे तो अशा शांततेमध्ये जास्त पाहायला मिळतो. या व्हायरल व्हिडीओबाबत बोलताना डीएफओ म्हणाल्या की, हा व्हिडीओ नक्कीच मेरठमधला आहे. मात्र हा व्हिडीओ लॉकडाऊन काळातील नाही आहे. साधारण वर्षभरापूर्वीचा हा व्हिडीओ आहे. ज्यावेळी आदिती शर्मा यांच्याबरोबर आयएफएस आकाश देखील होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून हा व्हिडीओ शूट केला आहे. काही दिवसांपूर्वी आकाश यांनी देखील ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेळी त्यांनी गंगेमध्ये दिसणाऱ्या डॉल्फिन्सबाबत सर्व माहिती दिली आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या