मुंबई, 29 एप्रिल : ट्विटरवर आयएफस ऑफिसर प्राण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. काही व्हिडीओ भीतीदायक असतात तर काही इतके Cute असतात की सोशल मीडियावर ते खूप व्हायरल होतात. आणि त्यावर येणाऱ्या कमेंट्सही भन्नाट असतात. सध्या आएफएस ऑफिसर प्रवीण कासवान यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये हत्तींचा एक कळप नदीत उतरत आहे. मात्र त्यावेळी 2 हत्तींची खूप गम्मत होते. यामधील एक हत्ती शिस्तीत कोरड्या नदीपात्रात उतरतो. मात्र दुसरा हत्ती सरकणाऱ्या वाळूचा वापर करत कोलांटी उडी मारून नदीपात्रात उतरतो. (हे वाचा- आता कोरोनासमोर झुकायचं नाही, त्याला झुकवायचं! हा PHOTO पाहून वाढेल तुमचं मनोबल ) कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे की, ‘नदीत उतरण्याचे दोन प्रकार असतात.’ हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट नाही पण यावर आलेल्या कमेंट्स मात्र खूप भन्नाट आहेत.
या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने जंगतातील चिखलातून घसरगुंडी करणाऱ्या आणखी एका हत्तीचा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, ‘3 प्रकार असतात.’
हे व्हिडीओ पाहून एकदम फ्रेश वाटायला होतं अस काही युजर्सनी म्हटलं आहे.
Hahaahaaha🤣, how cute and fun loving Elephants are.
— Meenakshi Agrawal (@Meenakshi1492) April 26, 2020
Such videos are mood refreshing😀😀😍
कासवान यांनी शेअर केलेला व्हिडीओ आतापर्यंत 24 हजारहून अधिकवेळा पाहण्यात आला आहे.