जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / कोरोना : MPSCची परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांची मागणी, 96 हजार विद्यार्थी चिंतेत

कोरोना : MPSCची परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांची मागणी, 96 हजार विद्यार्थी चिंतेत

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

एकट्या पुण्यात या परीक्षेसाठी 40 हजार विद्यार्थी बसणार आहे. त्याचबरोबर राज्यात 96 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

पिंपरी-चिंचवड 13 मार्च :  राज्य सेवा आयोगा मार्फत तीन वर्षातून एकदा RTOची परीक्षा घेतली जाते. RTOची ही परीक्षा येत्या 15 मार्च रोजी घेतली जाणार आहे. मात्र  झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाचा  संसर्ग विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. एकट्या पुण्यात या परीक्षेसाठी 40 हजार विद्यार्थी बसणार आहे. त्याचबरोबर राज्यात 96 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरात आल्यास गर्दी होऊ शकते. त्यांना संसर्ग झाल्यास हे लोण शहरातही पसरू शकते. किंवा ही परीक्षा देण्यासाठी पुण्यात आलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला नकळत कोरोनाचा संसर्ग झाला आणि तो गावाकडे तसाच परत गेला तर मोठी अडचण होऊ शकते, शिवाय अशा परिस्थितीत ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि  त्यांच्या पालकांवर मोठा मानसिक तणाव निर्माण झालाय. राज्य सेवा आयोगाची  होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परिक्षार्थी विद्यार्थ्यानी केली आहे. कोरोनामुळे राज्यातील पोल्ट्री व्यावसाय मोठ्या संकटात सापडला आहे. व्हॉट्सअप व्हायरल झालेल्या अफवा याला कारणीभूत असल्याची आरोप केला जातोय. चिकन आणि अंडी खाल्यामुळे कोरोनाची लागण होते, असे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरल्यामुळे त्याचा परिणाम पोल्ट्री व्यावसायीकांवर झालाय अहमदनगर जिल्हात एका महिन्यात 600 कोटींचा फटका बसला आहे. शरद पवारांचा काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का, विरोधाला न जुमानता मारली बाजी कोरोनाच्या अफवांमुळे पोल्ट्री फार्मचा व्यवसाय धोक्यात आलाय. राज्यात अनेक शेतकरी आज  शेतीला पर्याय म्हणून कुक्कुटपालन सुरु केलं आहे. राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना सोशल मीडियाच्या चुकीच्या व्हायरल फेस्टमुळे पुन्हा अधिकच संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकाकडून कर्ज घेऊन, शेड उभारले, पिल्ले वाढवली होती. मात्र  कोरोनाची एक चुकीची पोस्ट व्हायरस झाली आणि शेतकऱ्याचं आयुष्य उद्धवस्त झाले,  हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. असं शेतकऱ्यांच म्हणणं आहे.

‘तमाशा’लाही बसला ‘कोरोना’चा फटका, बारी ठरवण्यासाठी गावपुढारी फिरकेना

अहमदनगर जिल्ह्यात 14 तालुक्यात 200 पेक्षा जास्त फार्म्स आहेत. त्यात एक कोटी बारा लाख पक्षी आहेत 70 रुपये असणारा भाव आज फक्त 7 रुपयांवर आलाय. यामुळे जिल्ह्यतल्या व्यवसिकांना  एकाच महिन्यात 600 कोटींचा फटका बसला आहे. एखाद्याची एक चूक अनेकांचं आयुष्य कसे उद्धवस्त करू शकते त्यामुळे कुठलीही पोष्ट व्हायरल करताना विचार करणे गरजेचं आहे असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: RTO
  • First Published :
जाहिरात
जाहिरात