गोविंद कुमार (बिहार), 13 एप्रिल : बिहारमधील गोपालगंजमध्ये माहेरी असलेल्या एका विवाहितेची बोलावून हत्या करण्यात आली. सासरच्या छळाला कंटाळून माहेरी गेलेल्या पत्नीला पतीने पुन्हा घरी बोलावून तिची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पतीला मारून पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून मृतदेह नदीच्या काठावर पुरला. ही घटना सल्लेहपूर गावातील आहे. रामप्रवेश चौहान याच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत तर रंभा देवी असे मृत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपी सासू अनारकली देवी हिला अटक केली आहे. बाकीचे आरोपी घरातून पळून गेले आहेत. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर फरार आरोपींच्या शोधात पोलिस छापे टाकत आहेत.
पठ्याने घरालाच बनवलं OYO हॉटेल, बोर्ड पाहून लागल्या रांगा, अखेरीस पोलीस सुद्धा आले मग….विशंभरपूर पोलीस स्टेशनच्या तिवारी मटिहानिया गावातील रहिवासी रंभा देवी हिचा विवाह राम चौहान याच्यासोबत 20 मे 2021 रोजी झाला होता. लग्नानंतर सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र नंतर दारूच्या नशेत तिचा नवरा तिला मारहाण करू लागला. पतीच्या मारहाणीला कंटाळून पत्नी आपल्या माहेरी गेली. त्यानंतर पतीने त्याच दिवशी सायंकाळी तिची हत्या केली. घटनेनंतर रात्रीच इतर कुटुंबीयांच्या मदतीने मृतदेह नदीच्या काठावर नेऊन पुरला.
त्या महिलेची हत्या करून त्यावर झाडाची पाने टाकण्यात आले होते. कोणाला याबाबत शंका येऊ नये म्हणून हे करण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी नातेवाईकांची कसून तपासणी करताच तिची हत्याकरून नदी किणारी पुरल्याची कबुली देण्यात आली. यावेळी पोलिसांनी तपासादरम्यान व्हिडिओग्राफी करून मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी हुंडाबळी मृत्यूचा एफआयआर दाखल केला आहे. मृताचे वडील गमहा चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती रामप्रवेश चौहान, सासू अनारकली देवी, कल्लू चौहान, जोखू चौहान आणि निशा देवी यांच्यासह इतरांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपी अनारकली देवी हिला अटक करून तिची कारागृहात रवानगी केली.
हे प्रकरण गांभीर्याने घेत एसडीपीओ सदर एसडीपीओ संजीव कुमार यांनी पोलीस स्टेशन अध्यक्ष अमरेंद्र साह यांना फरार आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले. एसडीपीओ म्हणाले की पोलिसांनी हुंडाबळी मृत्यूचा एफआयआर नोंदवला आहे आणि एका महिला आरोपीला अटक केली आहे तर इतरांच्या शोधात छापे टाकले जात आहेत.