अहमदाबाद 19 जानेवारी : लग्नाचं एक अतिशय अनोखं प्रकरण समोर आलं आहे. गुजरातमधील तापी जिल्ह्यात एक अजब प्रकरण पाहायला मिळालं. यात नेवाळा गावातील प्रियकर आणि प्रेयसीचं नातं त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हतं. यामुळे त्यांनी या लग्नास नकार दिला. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी प्रियकर आणि प्रेयसीने एकमेकांना मिठी मारून आत्महत्या केली होती. यानंतर आत्महत्या केलेल्या तरुण-तरुणीचा पुतळा बनवून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं लग्न लावून दिलं. गणेश नावाच्या मुलाला त्याची गर्लफ्रेंड रंजनासोबत लग्न करायचं होतं. गणेश ऑगस्ट 2022 मध्ये रंजनासोबत त्याच्या घरी पोहोचला. त्याच्या कुटुंबीयांनी या नात्याला नकार दिला होता. त्यानंतर दोघेही घराबाहेर पडले आणि काही तासांनंतर त्यांचा मृतदेह झाडाला एकाच दोरीला लटकलेला आढळून आला. केस कापताना रडू लागली महिला; हेअर स्टायलिशने असं काही केलं की Video Viral रमेशभाई पाडवी म्हणाले की, दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करायचे, असं कुटुंबीयांना वाटलं. त्यामुळे, जे काम या दोघांसाठी पूर्वी करता आला नाही, ते आता या मार्गाने करण्याचा त्यांनी विचार केला. यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर दोघांच्याही पुतळ्याचं लग्न लावून दिलं आहे. आम्हाला विश्वास आहे, की यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल, असं ते म्हणाले.
गुजरात: सहा महिन्यांपूर्वी प्रियकर आणि प्रेयसीने एकमेकांना मिठी मारून आत्महत्या केली होती. कारण घरच्यांनी लग्नाला नकार दिला होता. यानंतर आत्महत्या केलेल्या तरुण-तरुणीचा पुतळा बनवून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं लग्न लावून दिलं आहे. pic.twitter.com/gDOwiq4pCl
— News18Lokmat (@News18lokmat) January 19, 2023
याच कारणामुळे दोघांच्या कुटुंबीयांनी मुलगा आणि मुलीचा पुतळा तयार करून लग्न निश्चित केल्यानंतर लग्नाचे सर्व विधी पार पडले. हा विवाह आदिवासी परंपरेनुसार पार पडला. या प्रकरणाबाबत कैलास रामभाई पाडवी यांनी सांगितलं की, या जोडप्याने एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी हा विवाह केला आहे. 16 वर्षाच्या विद्यार्थ्यावर शिक्षिकेचं जडलं प्रेम; दोघांनी उचललं असं पाऊल की पालकही हैराण मुलीचे आजोबा भीमसिंह पाडवी यांनी सांगितलं की, मुलाचे कुटुंबीय आधीपासूनच आमचे दूरचे नातेवाईक आहेत. त्यामुळे हे लग्न होऊ शकलं नव्हतं. मात्र आता दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी ठरवून हे लग्न पार पाडलं आहे.