मुंबई,14 सप्टेंबर- लग्न
(Wedding) हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण असतो. नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यासमवेत आनंदानं हा सोहळा साजरा केला जातो. विवाहसोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी अनेक जण वेगवेगळ्या कल्पना लढवत असतात. अगदी लग्नपत्रिकेपासून ते कपडे, दागिने, ठिकाण, सजावट, भोजन अशा अनेक गोष्टींमध्ये नावीन्य आणण्यावर भर दिला जातो. यामुळे सगळ्या जगाचं लक्ष वेधलं जातं. अलीकडेच अमेरिकेतल्या
(USA) एका लग्नाची आमंत्रणपत्रिका
(Wedding Invitation) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 'वन इंडिया डॉट कॉम'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी पत्रिका छापल्या जातात, त्यातही वेगवेगळ्या संकल्पना लढवल्या जातात. या लग्नपत्रिकेत मात्र पाहुण्यांसाठी एक विचित्र अट ठेवण्यात आल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, सोशल मीडियावर ही पत्रिका व्हायरल झाली आहे.
लग्नसोहळ्याला हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांना (Guests) भेटवस्तूच्या (Gifts) मूल्यानुसार डिनर (Dinner) दिलं जाणार आहे, असं या पत्रिकेत लिहिलं आहे. प्रत्येक डिनरच्या प्रकारानुसार भेटवस्तू देण्याची अट यात नमूद करण्यात आली आहे. या कार्डमध्ये असं लिहिलं आहे, की लग्नात उपस्थित असलेल्या पाहुण्यांना भेटवस्तूच्या किमतीनुसार रात्रीचं जेवण दिलं जाईल. चार श्रेणींनुसार भेटवस्तू आणण्याची विनंती करण्यात आली आहे. ‘लव्हिंग गिफ्ट’ (Loving Gift) या पहिल्या श्रेणीत 250 डॉलर्स म्हणजेच सुमारे 18 हजार रुपये किमतीची भेट देणाऱ्या पाहुण्यांना चिकन किंवा मासे यांचा समावेश असलेलं भोजन दिलं जाईल.
(
हे वाचा:आजीनं अचानक केलं आजोबांना KISS; VIDEO मध्ये पाहा आजोबांची प्रतिक्रिया)
‘सिल्व्हर गिफ्ट’ (Silver Gift) श्रेणीत 36 हजार रुपयांची भेट देणाऱ्या लोकांना रोस्टेड चिकन किंवा सालमन मासे, तसंच स्टेक यांचा समावेश असलेलं भोजन दिलं जाईल. ‘गोल्डन गिफ्ट’ (Golden Gift) श्रेणीत 73 हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तूंच्या बदल्यात लॉब्स्टर टेल्स आणि फिले मिग्नॉन्स यांचा समावेश असलेलं भोजन दिलं जाईल. ‘प्लॅटिनम भेटवस्तू’ (Platinum Gift) या श्रेणीतल्या लोकांना सुमारे अडीच लाख रुपयांची भेट आणावी लागेल. या लोकांना वरील तीन श्रेणींमध्ये दिल्या जाणाऱ्या पदार्थांसह शॅम्पेन आणि लॉबस्टर यांचा समावेश असलेलं भोजन दिलं जाईल.
सोशल मीडियावर ही लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल झाली असून, युझर्स भरभरून कमेंट्स करत आहेत. 'या लग्नासाठी 2500 डॉलर्स खर्च करण्यापेक्षा मी आयर्लंडला एक आठवडा घालवण्यासाठी खर्च करेन,' अशी कमेंट एका युझरनं केली आहे. काही युझर्स मात्र हे कार्ड बनावट असल्याचं सांगत आहेत. त्यामुळं हे कार्ड खरं आहे की खोटं हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. लोक काय काय शक्कल लढवू शकतात याची चुणूक या पत्रिकेद्वारे मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.