मराठी बातम्या /बातम्या /Viral /

या पठ्ठ्यानं टॉयलेट पेपरवर लिहिला राजीनामा, बॉसही ठरला शेरास सव्वाशेर

या पठ्ठ्यानं टॉयलेट पेपरवर लिहिला राजीनामा, बॉसही ठरला शेरास सव्वाशेर

नोकरीला कंटाळलेल्या (Man writes witty resignation letter on a toilet paper) एका व्यक्तीनं चक्क टॉयलेट पेपरवर राजीनामा लिहून तो आपल्या बॉसकडे धाडला.

नोकरीला कंटाळलेल्या (Man writes witty resignation letter on a toilet paper) एका व्यक्तीनं चक्क टॉयलेट पेपरवर राजीनामा लिहून तो आपल्या बॉसकडे धाडला.

नोकरीला कंटाळलेल्या (Man writes witty resignation letter on a toilet paper) एका व्यक्तीनं चक्क टॉयलेट पेपरवर राजीनामा लिहून तो आपल्या बॉसकडे धाडला.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: नोकरीला कंटाळलेल्या (Man writes witty resignation letter on a toilet paper) एका व्यक्तीनं चक्क टॉयलेट पेपरवर राजीनामा लिहून तो आपल्या बॉसकडे धाडला. सोशल मीडियावर सध्या (Resignation letter goes viral) या अजब राजीनाम्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एका कंपनीतून राजीनामा देऊन दुसऱ्या कंपनीत काम सुरू करण्याचे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात कधी ना कधी येतच असतात. मात्र नोकरी सोडताना जो राजीनामा दिला जातो, तो अत्यंत गंभीरपणे आणि औपचारिक (Resignation in informal language) भाषेत लिहिला जातो. त्याची एक ठरलेली पद्धत असते आणि आदरपूर्वक तो वरिष्ठांना सादर केला जातो. मात्र एका व्यक्तीने ही नेहमीची बोअरिंग पद्धत झुगारून देत चक्क टॉयलेट पेपरवरच आपला राजीनामा लिहिला आणि तो बॉसला पाठवून दिला.

विचित्र राजीनामा

लेविस नावाच्या व्यक्तीनं हा राजीनामा सोशल मीडियावर पोस्ट केला असून आपण तो बॉसला देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावर काही शब्दांचा मजकूर लिहिला असून खाली एक चित्रही रेखाटण्यात आलं आहे. या कागदारवर लेविसनं लिहिलंय, जो मी 25 तारखेपासून निघून जाईन. बस्स, एवढाच आहे हा राजीनामा. राजीनाम्याच्या मोजक्या चार पाच शब्दांखाली त्यानं एक चित्रदेखील काढलं आहे. या चित्रात कपडे न घातलेलं एक कार्टून दिसतं. स्वतःचं प्रतिक म्हणून हे कार्टून काढल्याचं त्यानं म्हटलं आहे.

राजीनामा होतोय व्हायरल

हा राजीनामा सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून त्याला विविध प्रतिक्रिया मिळत आहेत. या राजीनाम्याच्या खाली सही कुठे केलीय, असा सवाल एका युजरने उपस्थित केला आहे. तर हा राजीनामा कुणाचा हे कसं कळणार, असा सवाल दुसऱ्याने विचारला आहे. जर राजीनामा देणाऱ्याचे नावच खाली लिहिले नसेल, तर हा यो नावाचा जो बॉस आहे, त्याला कुणाचा राजीनामा आहे, हे कसं समजेल, असा सवाल एका युजरने विचारला आहे.

हे वाचा- एका मताने पराभवामागचं खरं कारण आलं समोर, स्वत: शशिकांत शिंदेंनीच दिलं उत्तर

बॉसनं केली कमाल

आता अशा प्रकारे टॉयलेट पेपरवर राजीनामा सादर केल्यानंतर बॉस चिडेल आणि काहीतरी संतापजनक प्रतिक्रिया देईल, अशीच सर्वसाधारण अपेक्षा असते. मात्र बॉसने नेमकं याच्या उलटं केलं. त्याने आनंदाने हा राजीनामा स्विकारला आणि या कर्मचाऱ्याला निरोप दिला, असं ही पोस्ट करणाऱ्याने म्हटलं आहे. त्यामुळे बॉसदेखील शेरास सव्वाशेर ठरल्याचं दिसून आलं आहे. आपण इतके आळशी होतो की आपला राजीनामा सहज स्विकारण्यात आला, असा विनोदही लेविसने केला आहे.

First published:

Tags: Employment, PHOTOS VIRAL, Resignation