जाहिरात
मराठी बातम्या / Viral / काय सांगता! काहीच न करता प्रत्येक महिना मिळणार 10 लाख; पण कसे ते पाहा

काय सांगता! काहीच न करता प्रत्येक महिना मिळणार 10 लाख; पण कसे ते पाहा

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

एका व्यक्तीने फक्त एकदाच एक छोटंसं काम केलं आणि आता त्याला दर महिन्याला 10 लाख रुपये मिळणार आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

लंडन, 12 मे : पैसे कमावण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. पण काही लोकांचं नशीब त्यांना इतकी साथ देतं की काही क्षणात ते श्रीमंत होतात. अशीच एक व्यक्ती सध्या चर्चेत आली आहे. जिने फक्त एक छोटंसं काम केलं आणि तिचं नशीबच फळफळलं. क्षणात ही व्यक्ती लखपती झाली. आश्चर्य म्हणजे आता काहीच न करता या व्यक्तीला दर महिन्याला 10 लाख रुपये मिळणार आहेत. ब्रिटनमध्ये राहणारा 50 वर्षांचा पॉल बेव्हन्स. इतकी वर्षे कष्ट करून तो पैसे कमवून ते आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी बचत करत होता. पण ते शक्य झालं नाही. अखेर त्याने एक असं छोटंसं काम केलं की आता त्याची स्वप्नं सहज पूर्ण होतील. 27 मार्च रोजी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. काही दिवसांपूर्वी त्याचा ड्रॉ निघाला, तेव्हा तो शॉक झाला, तो भाग्यवान विजेता ठरला. पॉलला एक वर्षासाठी 10000 पाऊंड म्हणजे तब्बल  10 लाख रुपयांचा जॅकपॉट लागला. म्हणजे इतके पैसे वर्षभर त्याला दर महिन्याला मिळणार. पण त्याला विश्वासच बसत नव्हता. म्हणून तो लॉटरीचा नंबर पुन्हा पुन्हा पाहत होता. इतकंच नव्हे तर त्याने खात्री करून घेण्यासाठी आपल्या मित्रांनाही तो नंबर दाखवला. जबरा फॅन! फेव्हरेट सेलिब्रिटीला प्रत्यक्ष पाहिलं आणि स्वतःचे ‘डोळे’ विकायला काढले; अजब कारण मेट्रोच्या वृत्तानुसार, जॅकपॉट लागताच बेव्हन्स इतका आनंदी झाला की त्याने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना सुट्टी दिली. त्यांच्यासोबत तो पार्टी करायला गेला. पण लक्षाधीश झाल्यानंतरही पॉलने काम थांबवण्याचा कोणताही विचार केलेला नाही.  भविष्यात काय होईल, हे सांगता येणार नाही, असं तो म्हणाला. आता इतक्या पैशांचं काय करणार याबाबत सांगताना तो म्हणाला, खरं सांगायचं तर मी आयुष्यभर खूप कष्ट केले, पण जितकी स्वप्न पाहिली तितके पैसे कधीच मिळाले नाहीत. माझ्या काही इच्छा होत्या ज्या फारशा नव्हत्या पण त्या पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. कुठेतरी फिरायला जावं म्हणून मी काही वर्षांपासून बचत करत आहे. आता मी हे महिन्यातून अनेक वेळा करू शकतो. जगातील अशी बँक जिथे फक्त दोनच कर्मचारी करतात काम मी लगेच काही खरेदी करणार नाही. वाट पाहिन आणि  स्वस्त काही मिळत असेल तर खरेदी करेन. टुरिस्ट बस घेण्याचा माझा विचार आहे.. जमैकामध्ये सुट्टी घालवायची आहे कारण माझी आई तिथे गेली होती. ते बेट स्वर्गासारखे आहे. मी लिव्हरपूलच्या खेळाडूंना भेटेन. त्यांचा मी चाहता आहे. टीव्हीशिवाय त्यांना मैदानावर खेळताना कधी पाहिलं नाही, ते पाहण्याची इच्छा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात