जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जबरा फॅन! फेव्हरेट सेलिब्रिटीला प्रत्यक्ष पाहिलं आणि स्वतःचे 'डोळे' विकायला काढले; अजब कारण

जबरा फॅन! फेव्हरेट सेलिब्रिटीला प्रत्यक्ष पाहिलं आणि स्वतःचे 'डोळे' विकायला काढले; अजब कारण

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

एक असा चाहता ज्याने आपल्या फेव्हरेट सेलिब्रिटीला पाहिल्यानंतर असं काही केलं ज्याचा कधी कुणी स्वप्नातही विचार केला नसेल.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 11 मे : अभिनेता-अभिनेत्री असो, गायक-गायिका असो, दिग्दर्शक-निर्माता असो वा कोणता खेळाडू… आपल्या फेव्हरेट सेलिब्रिटीला प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा तर अनेकांची असते. त्यांना पाहण्यासाठी चाहते काय काय नाही करत आणि पाहिल्यानंतर तो क्षण जपून ठेवला जातो. पण एक असा चाहता ज्याने आपल्या फेव्हरेट सेलिब्रिटीला पाहिल्यानंतर असं काही केलं ज्याचा कधी कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. या व्यक्तीने ज्या डोळ्यांनी त्या सेलिब्रिटीला पाहिलं ते आपले डोळेच विकायला काढले आहे. प्रसिद्ध पॉप सिंगर टेलर स्विफ्टचा हा चाहता आहे. जो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा चाहताच टेलरचा इतका वेडा चाहता आहे की तुम्ही विचारही केला नसेल. अनेक वर्षांपासून या चाहत्याला एकदा तरी टेरलचा लाइव्ह शो आपण पाहावा अशी इच्छा होती. अखेर त्याची इच्छा पूर्ण झाली. ही व्यक्ती जिथं राहते, त्या शहरात टेलरचा शो झाला. त्या शोला जाण्याचं त्याने ठरवलं.  त्याला तो क्षणही जतन करून ठेवायचा होता. आता सामान्यपणे अशी काही आठवण आपण कॅमेऱ्यात किंवा मोबाईलमध्ये जपून ठेवू शकतो. पण या व्यक्तीने मात्र वेगळीच विचित्र आयडिया काढली. विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहताच महिला शॉक; रात्रीच्या प्रवासात काय दिसलं पाहा VIDEO या व्यक्तीने कॉन्टॅक्ट लेन्स घेतले आणि ते आपल्या डोळ्यात घातले. डोळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स लावून तो  टेलरचा शो पाहण्यासाठी पोहोचला. आता त्याने तेच कॉन्टॅक्ट लेन्स विकायला काढले. एका ऑनलाईन पोर्टलवर त्याने हे कॉन्टॅक्ट लेन्स लिलावासाठी लावले आहेत. ज्याची किंमत तब्बल 10 हजार डॉलर्स म्हणजे सुमारे 8 लाख रुपये. त्याने म्हटलं, की तुम्ही या दोन छोट्या प्लॅस्टिक डिस्कचे मालक होऊ शकता. ही सामान्य डिस्क नाही, तर यातून प्रसिद्ध पॉपस्टार टेलर स्विफ्ट दिसली आहे. या कॉन्टॅक्ट लेन्स चांगल्या स्थितीत आहेत. तुम्ही तुमच्या डोळ्यांसमोर ठेवल्यानंतर तुम्हालाही टेलरच्या शोमध्ये असल्यासारखं वाटेल. आयफोनसाठी काय पण! गटारात फोन पडताच तरुणाचं धक्कादायक वागणं, नक्की हा प्रकार काय? या व्यक्तीची अशी पोस्ट पाहून सर्वजण चक्रावले. दरम्यान जिथं या व्यक्तीने हे कॉन्टॅक्ट लेन्स लिलावासाठी टाकले त्या पोर्टलने या व्यक्तीची पोस्ट काढून टाकली आहे. तुम्ही इतर कुणाचे कॉन्टॅक्ट लेन्स वापरू शकत नाही, असं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral
  • First Published :
जाहिरात
जाहिरात