मराठी बातम्या /बातम्या /Viral /याला म्हणतात LUCK! पठ्ठ्याला लागला Jackpot; खरेदी केलेल्या वीसच्या वीस Lottery एकाच वेळी जिंकला

याला म्हणतात LUCK! पठ्ठ्याला लागला Jackpot; खरेदी केलेल्या वीसच्या वीस Lottery एकाच वेळी जिंकला

या पठ्ठ्याला नशीबाने जबरदस्त साथ दिली.

या पठ्ठ्याला नशीबाने जबरदस्त साथ दिली.

या पठ्ठ्याला नशीबाने जबरदस्त साथ दिली.

वॉशिंग्टन, 30 ऑक्टोबर : झटपट पैसा मिळावा असं कुणाला वाटत नाही. यासाठी लोक वेगवेगळे मार्ग निवडतात. त्यापैकीच एक म्हणजे लॉटरी. काही लोकांना नेहमी लॉटरी खरेदी कऱण्याची सवय असते. कधी ना कधी तरी आपलं नशीब आपल्याला साथ देईल, लॉटरी (Lottery) लागून आपलं नशीब फळफळेल अशी आशा त्यांना असते. किती तरी वेळा लॉटरी खरेदी केल्यानंतर क्वचितच एखादी लॉटरी लागते. पण एका पठ्ठ्याच्या नशीबाने त्याला जबरदस्त साथ दिली. त्याने 20 लॉटरीची तिकीटं खरेदी केली आणि सर्वच्या सर्व लॉटरी तो जिंकला (Man won 20 lottery).

अमेरिकेच्या व्हर्जनियातील अलेक्झेंड्रियात राहणारा विलिमय नेवेल. त्याने एकाच वेळी एकसमान 20 लॉटरी तिकीट खरेदी केली आणि या वीसच्या वीस लॉटरी तो एकाच वेळी जिंकला.

रिपोर्टनुसार विलिमने व्हर्जियना लॉटरीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तो सामान्यपणे जवळील स्टोरमधून तिकीट खरेदी करायचा. पहिल्यांदाच ऑनलाइन तिकीट खरेदी केलं. 23 ऑक्टोबरला त्याने 20 सारखेच तिकीट खरेदी केले.  5-4-1-1 या नंबर्सचे तिकीट आणि ही सर्व तिकीटं तो जिंकला.

हे वाचा - केसांसाठी खर्च केले तब्बल 35 हजार रुपये; आरशात पाहताच ढसाढसा रडू लागली महिला

प्रत्येक तिकीटावर त्याला 5 हजार डॉलर्स असे एकूण 20 बक्षीसं त्याला मिळाली. एकून 1 लाख डॉलर्सचा जॅकपॉट त्याने आपल्या नावार केला. त्याने जवळपास  74,91,540 रुपये जिंकले.

एकाच वेळी 20 लॉटरी तिकीट जिंकल्यानंतर नेवेल म्हणाला, खूप चांगलं वाटलं यात वादच नाही. अद्याप हे पैसे कुठे खर्च करायचे याची काही योजना केलेली नसल्याचंही त्याने सांगितलं.

65 वर्षीय व्यक्तीला एका झटक्यात लागली15 कोटींची लॉटरी

याआधी मेरीलँडमधील एकाला 15 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. 65 वर्षांच्या व्यक्तीने उत्तर सॅलिसबरीमधील एक्सॉन स्टेनरवर मेरीलँड लॉटरीची तिकीटं काढली. त्याने लॉटरी अधिकाऱ्यांना सांगितलं की त्याला पहिल्या तिकीटावर 100 डॉलरचं बक्षीस लागलं पण दुसऱ्या तिकीटवर त्याला लॉटरीचं सर्वोच्च म्हणजे 2 मिलियन डॉलरचं बक्षीस लागलं. दोन मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 14 कोटी 95 लाख 44 हजार रुपये. अशाप्रकारे त्याने सर्वोच्च बक्षीस (Jackpot Prize) मिळवलं आणि 65 व्या वर्षी अचानकच 15 कोटी रुपयांचा मालक झाला.

हे वाचा - साफसफाई करताना महिलेला कचऱ्यात सापडला चमकणारा दगड; किंमत ऐकताच बसला धक्का

तो लॉटरी विजेता म्हणाला,‘मी थोडा नाराज होतो. माझ्याकडे जे तिकीट आहे त्याची शेवटची तारीख जवळ येत होती. मला शंका होती की ते खरोखरच लॉटरी तिकीट (Lottery Ticket) आहे की नाही. पण शेवटची तारीख यायच्या आधीच मला लॉटरी लागली आणि मी जॅकपॉट जिंकलो. मी गेल्या अनेक वर्षांपासून हे तिकीट काढत होतो पण मला यश आलं नाही अखेर कोरोनाकाळानंतर पैशांची गरज असतानाच मला हे तिकीट लागलं आणि जॅकपॉटही मिळाला.’

First published:

Tags: Lottery, Money, Viral, World news