नवी दिल्ली 07 जानेवारी : ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही अनेकांना खिडकीच्या कडेची जागा मिळवण्यासाठी भांडताना पाहिलं असेल. काही लोकांना थंड हवेची मजा घेत बाहेरचं दृश्य पाहायला आवडतं. तर काही लोक ट्रेनमध्ये झोपूनच आपला वेळ घालवतात. यातील काही लोक तर असे असतात, ज्यांच्यामुळे इतक प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो. तर काही लोकांसोबत झोपेच्या नादात अशा घटना घडतात की त्यांनाच अपमान सहन करावा लागतो. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Funny Video Viral on Social Media) होत आहे.
VIDEO - मैत्रिणीने अचानक सर्वांसमोरच दिलं गिफ्ट; नवरीबाईच नाही तर नवरदेवही लाजला
या व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती ट्रेनमधील सीटवर बसलेला असतानाच अगदी गाढ झोपेत जातो आणि नंतर धाडकन सीटवरुन खाली पडतो (Funny Incident Happened in Train). हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रवासी आपल्या आपल्या सीटवर बसलेले आहेत. तर काही लोक उभा राहून प्रवास करतानाही दिसत आहेत. यादरम्यान एक व्यक्ती अगदी गाढ झोपेत असल्याचं दिसतं. मात्र त्याला अजिबातही अंदाज नसतो की पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत काय घडणार आहे.
हा व्यक्ती काही वेळातच झोपेतच सीटवरून धाडकन खाली कोसळतो. यानंतर तो झोपेतून जागा झाला. अचानक घडलेला हा प्रकार पाहून काहीवेळासाठी आसपासचे लोकही घाबरले. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sayyyam_pi नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. 6 डिसेंबरला अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. याचा अंदाज यावरुन लावता येतो की आतापर्यंत 1 लाख 64 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.
Shocking Video : मादी कुत्र्यासोबत खेळायला यायचा कुत्रा; तरुणाने जीवच घेतला
एका यूजरने कमेंट करत लिहिलं, लक्ष देऊन पाहा..ज्या लोकांना अशा ठिकाणी झोप येते, त्यांच्यासोबतही हे घडू शकतं. दुसऱ्या एका यूजरने आपल्या मित्राला टॅग करत लिहिलं, बघ, कोणीतरी व्यक्ती तुझ्यासारखाच विचार करत आहे. आणखी एकाने आपल्या मित्राला कमेंटमध्ये टॅग करत लिहिलं, की पुढच्या वेळी झोपण्याच्या आधी हा व्हिडिओ नक्की आठव.