जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दोन बैलांची लागली झुंज, वृद्ध महिला मध्येच सापडली, LIVE VIDEO

दोन बैलांची लागली झुंज, वृद्ध महिला मध्येच सापडली, LIVE VIDEO

दोन बैलांच्या झुंजीत एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे.

दोन बैलांच्या झुंजीत एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी एक म्हण तुम्ही नेहमी ऐकत आला असला. परंतु दोघांच्या तिसर्‍याला आपला जीव गमवावा लागला आहे.

  • -MIN READ Local18 New Delhi,Delhi
  • Last Updated :

रामकुमार नायक (दुर्ग), 29 एप्रिल : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी एक म्हण तुम्ही नेहमी ऐकत आला असला. परंतु दोघांच्या तिसर्‍याला आपला जीव गमवावा लागला आहे. छत्तीसगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दोन बैलांच्या भांडणात एका वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावर बैल भांडत असताना 80 वर्षांची आजी घराबाहेर बसली होती. यावेळी दोन बैलांची झुंज सुरू असताना दोन्ही बैल आजीच्या जवळ आले. अन् आजीला सावरण्याची संधीही मिळाली नाही. बैलाच्या धक्क्यामुळे उडून ती भिंतीवर आदळली. घटनेच्या वेळी आसपास उपस्थित असलेल्या लोकांनी गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केला पण तिचा मृत्यू झाला.

जाहिरात

शिव नगर डोंगिया येथील रहिवासी असलेल्या 80 वर्षीय रुख्मीनबाई साहू या आपल्या घराच्या दरवाजाजवळ बसल्या होत्या. त्याचवेळी काही अंतरावर रस्त्यावर दोन बैलांमध्ये जोरदार झुंज सुरू होती. भांडत असतानाच तो बैल बसलेल्या वृद्धेजवळ आला. त्यापूर्वी ती महिला उठून घरात जाण्या आदीच बैलांने लाथ मारली. यातून ती महिला भिंतीला आदळत दारात पडली.

अस्वलाच्या हुशारीने व्हाल अवाक्, संयम आणि एकाग्रतेनं केली शिकार, Video Viral

यावेळी शेजारी उभ्या असलेल्या महिला आणि हातगाडीतील भाजी विकणाऱ्या व्यक्तीही बैलांच्या तावडीत सापडले असते. परंतु ते थोडक्यात वाचले. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी अॅम्ब्युलन्स बोलावून तिला जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत रुख्मीनबाईंचा मृत्यू झाला होता.

जाहिरात

या संपूर्ण घटनेचे फुटेज घरासमोर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मात्र, या घटनेमुळे दुर्ग महापालिकेच्या कामांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

हत्तीसोबत पंगा घेत होती तरुणी; गजराजने रागात हल्ला करताच उडून पडली, Shocking Video

संपूर्ण राज्यात रोका छेका मोहीम राबवली जात असल्याचा सरकारचा दावा आहे. परंतु दुर्ग शहरात मात्र भटकी जनावरे मोकाट फिरत आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात