मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: आधी लगावले जोरदार ठुमके, मग ढसाढसा रडू लागली नवरी; कारण जाणून व्हाल हैराण

VIDEO: आधी लगावले जोरदार ठुमके, मग ढसाढसा रडू लागली नवरी; कारण जाणून व्हाल हैराण

व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला नवरीबाई धमाकेदार डान्स (Bride Dance) करताना दिसते. यात ती आपल्या भावांसोबत मस्ती करत ठुमके लगावत आहे

व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला नवरीबाई धमाकेदार डान्स (Bride Dance) करताना दिसते. यात ती आपल्या भावांसोबत मस्ती करत ठुमके लगावत आहे

व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला नवरीबाई धमाकेदार डान्स (Bride Dance) करताना दिसते. यात ती आपल्या भावांसोबत मस्ती करत ठुमके लगावत आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 24 ऑक्टोबर : लग्नाचा दिवस नवरी-नवरदेव (Bride and Groom) आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत खास असतो. या दिवसासाठी नवरीबाईच्या घरी अनेक दिवसांपासून तयारी सुरू असते. सोशल मीडियावर (Social Media) सतत लग्नातील वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल (Viral Wedding Videos) झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र, सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. लोक वारंवार हा व्हिडिओ पाहत आहेत. या व्हिडिओमध्ये लग्नाआधी आणि लग्नानंतरची नवरी पाहायला मिळते (Before and After Marriage Video). पहिल्या भागात नवरी अतिशय आनंदात दिसत आहे तर दुसऱ्या भागात ती रडत आहे.

रेल्वे रुळावर अडकलेला कुत्रा, इतक्यात ट्रेन आली अन्..; अंगावर काटा आणणारा VIDEO

या व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला नवरीबाई धमाकेदार डान्स (Bride Dance) करताना दिसते. यात ती आपल्या भावांसोबत मस्ती करत ठुमके लगावत आहे. ‘मुझे साजन के घर जाना है…..’ गाण्यावर ती नाचत आहे आणि तिचे भाऊही मागे डान्स करताना दिसत आहेत. मात्र, काहीच काळानंतर ती रडताना दिसते. या डान्सनंतर व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये नवरी भांडी धुताना दिसत आहे.यावेळी ‘मुझे अपने घर जाना है….’ असं ती म्हणत आहे.

लग्नाआधी आणि नंतरचा फरक दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या व्हिडिओमध्ये लग्नाच्या आधीचा आनंद आणि लग्नानंतर होणारी अवस्था यातील फरक दाखवण्यात आला आहे. अनेक मुलींना हा व्हिडिओ पाहून यावर कमेंट केल्या आहेत. हे खरंच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

VIDEO:आधी पकडून ठेवलं, मग..; लग्नात मेहुण्यांनी केलेले दाजीचे हाल पाहून चक्रावाल

लोक नवरीबाईचा डान्स आणि तिनं भांडी धुताना दिलेल्या हावभावांवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. @MuskanSharma नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड झाला आहे. एक यूजरनं यावर कमेंट करत लिहिलं, की साजनच्या घरी जाण्याची हीच तर मजा आहे. दुसऱ्या यूजरनं लिहिलं, डान्स पाहून मजा आली. आणखी एकानं लिहिलं, लग्नानंतरचं सत्य.

First published:

Tags: Bride, Funny video, Video Viral On Social Media