Home /News /lifestyle /

OMG! सोशल मीडियावर VIDEO पाहून लावला फेस मास्क; तरुणीच्या चेहऱ्याचं काय झालं तुम्हीच पाहा

OMG! सोशल मीडियावर VIDEO पाहून लावला फेस मास्क; तरुणीच्या चेहऱ्याचं काय झालं तुम्हीच पाहा

तिने आपल्या चेहऱ्यावरील फेस मास्क काढला आणि तिला धक्काच बसला.

    वॉशिंग्टन, 08 जून : आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक तरुणीला वाटतं. त्यामुळे एखादा कार्यक्रम असो किंवा काही विशेष दिवस, तरुणी आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेतात. आपला चेहरा टवटवीत, तरुण, तजेलदार दिसावा यासाठी काय काय उपाय केले जात नाहीत. कुणी स्पेशल ब्युटी ट्रिटमेंट घेतं, कुणी फेशिअल करतं, तर कुणी घरगुती उपाय करतं. सध्या घरच्या घरीही वापरता येतील, असे बरेच फेस मास्कही (Face mask) उपलब्ध आहेत आणि अशाच फेस मास्क वापरणं एका तरुणीला चांगलंच महागात प़लं आहे. या तरुणीला नोकरीसाठी मुलाखत द्यायची होती. त्यासाठी आपला लूक चांगला असावा म्हणून तिने चेहऱ्यावर फेस मास्क लावलं. ती ग्रीन फेस मास्कचा (Green face mask) वापर करते. पण जेव्हा ती हा फेस मास्क काढते, तेव्हा तिला स्वतःचा चेहरा बघूनच धक्का बसतो. हे वाचा - साडीतल्या या सुंदर नारीला नाजूक समजू नका; तिचा VIDEO पाहून सर्वांना फुटला घाम मेट्रो यूकेच्या रिपोर्टनुसार, एका टिकटॉक युझर्सच्या क्लोरोफिल फेस मास्कचा व्हिडीओ पाहून तिने स्वतःवर हा प्रयोग केला. . या महिलेने मुलाखतीच्या आधी आपल्या चेहऱ्यावर ग्रीन फेस मास्क लावला. पण या ग्रीन फेस मास्कममुळे तिचा रंग उजळला नाहीच पण हिरवा मात्र झाला. आता तिला आपला चेहरा आधी जसा होता तसा हवा आहे. यासाठी तिने सोशल मीडियावर मदत मागितली आहे. मला नोकरीसाठी मुलाखत द्यायची आहे. माझ्या चेहऱ्यावरील हा रंग मी कसा हटवू शकते, याची कुणाला आयडिया आहे का? हा रंग जातच नाही आहे. मला मदतीची गरज आहे, असं तिने आपला व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हे वाचा - प्रसूतीनंतर वाढलेलं वजन प्रयत्न करूनही कमी होत नाही; वाचा या खास टिप्स दरम्यान तुम्ही असा प्रयोग करणार असाल तर सावध राहा. सोशल मीडियावर पाहून असे प्रयोग बिलकुल करू नका. काहीही करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Beauty tips, Face, Face Mask, Skin, Viral, Viral news, Viral photos, Woman

    पुढील बातम्या