मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Weird Food : तरुणीनं आनंदानं खाल्ली आईस्क्रीम, नंतर अशी झाली ओठांची अवस्था

Weird Food : तरुणीनं आनंदानं खाल्ली आईस्क्रीम, नंतर अशी झाली ओठांची अवस्था

Weird Food Items - सुरुवातीला त्याची गोड चव लागते. पण हळू हळू तिखटपणा जाणवू लागतो. थोडा वेळ हा गोड-तिखट असा खेळ सुरू राहतो. त्यानंतर काही वेळाने तोंडात असा स्फोट होतो की सांगायला नको.

Weird Food Items - सुरुवातीला त्याची गोड चव लागते. पण हळू हळू तिखटपणा जाणवू लागतो. थोडा वेळ हा गोड-तिखट असा खेळ सुरू राहतो. त्यानंतर काही वेळाने तोंडात असा स्फोट होतो की सांगायला नको.

Weird Food Items - सुरुवातीला त्याची गोड चव लागते. पण हळू हळू तिखटपणा जाणवू लागतो. थोडा वेळ हा गोड-तिखट असा खेळ सुरू राहतो. त्यानंतर काही वेळाने तोंडात असा स्फोट होतो की सांगायला नको.

  • Published by:  News18 Desk

08 जून : जगभरामध्ये खाद्य पदार्थांचा विचार करता अनेक विचित्र असे फूड आयटम्सदेखिल (Weird Food Items)ट्रेंड करत असतात. ते खाणं तर लांबच राहिलं, पण तसा विचार करण्याआधीही 100 वेळा विचार करावा लागेल.  असाच एक ट्रेंड सध्या प्रसिद्ध फूड चेन मॅक डी (Mac D) ने सुरू केला आहे. याठिकाणी आईस्क्रीमचा एक नवा फ्लेवर सादर करण्यात आला आहे. हिरव्या मिरचीचा फ्लेवर असलेली ही आईस्क्रीम (Green Chilly Ice Cream) लोकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांनी ही आईस्क्रीम टेस्टदेखील केली आहे. त्याच्या प्रतिक्रिया मात्र चवीप्रमाणेच बुचकाळ्यात टाकणाऱ्या होत्या. एका टिकटॉक यूझरनं ही आईस्क्रीम खाऊन सर्वांबरोबर हा अनुभव शेअर केला आहे.

(वाचा-पोस्टमननं कुत्र्याला बेदम मारलं, बेशुद्ध झाल्यानंतरही मारत राहिला, Video Viral)

प्रसिद्ध इंग्रजी वेबसाईट मिरर (Mirror) च्या पत्रकार कॉर्टनी पोचीन (Courtney Pochin)यांनी मॅक डीच्या हिरव्या मिरचीच्या फ्लेवरची आईस्क्रीम खाऊन लोकांबरोबर हा अनुभव शेअर केला. सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा ट्रेंड कॉर्टनी यांनीही फॉलो केला. त्यात लोकांनी काही जणांनी मॅक डी मध्ये भेटणारी ही हिरव्या मिरचीच्या फ्लेवरची आईस्क्रीम खाल्ली. काही जणांना ही आवडली तर काही जणांनी हा सर्वात खराब फ्लेवर असल्याचंही म्हटलं. या संमिश्र प्रतिक्रियानंतर कॉर्टनीनं स्वतःच अनुभव घ्यायचं ठरवलं.

(वाचा-दिवस पलटले! वाचा रातोरात लोकप्रिय झालेल्या 'बाबा का ढाबा'ची आता काय आहे अवस्था)

चीनमधून सुरू झाला ट्रेंड

हिरव्या मिरचीच्या फ्लेवरच्या आईस्क्रीमचा ट्रेंड चीनमधून सुरू झाल्याची माहिती आहे. याठिकाणी विचित्र फ्लेवर लोकांना अधिक आवडतात. तिथूनच हा ट्रेंड सुरू झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या एका फूड लव्हरने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. सर्वात आधी साध्या आईस्क्रीमवर मिरची क्रश करून ती सर्व्ह करण्यात आली. त्यानंतर वाढत्या मागणीनंतर याचा फ्लेवर तयार करण्यात आला.

अशी होती प्रतिक्रिया

हिरव्या मिरचीची ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कॉर्टनीनं याबाबत तिची प्रतिक्रिया दिली. तिनं सांगितलं की, सुरुवातीला त्याची गोड चव लागते. पण हळू हळू तिखटपणा जाणवू लागतो. थोडा वेळ हा गोड-तिखट असा खेळ सुरू राहतो. त्यानंतर काही वेळाने तोंडात असा स्फोट होतो की सांगायला नको. चुकून तुम्ही जर ओठांना आईस्क्रीमचा स्पर्श केला तर समजा तुमचं काही खरं नाही. कॉर्टनीनं सांगितलं की, मिरचीचा तिखटपणा दोन दिवस ओठांवर कायम राहतो. त्यामुळं ओठांची जळजळ होत राहते.

First published:

Tags: Food, Viral, Viral news