मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! 43 वर्षात पठ्ठ्याने केली 53 लग्नं; अतिशय विचित्र आहे कारण

बापरे! 43 वर्षात पठ्ठ्याने केली 53 लग्नं; अतिशय विचित्र आहे कारण

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

“53 वेळा विवाह (Marriage) हा काही मजा आणि शरीरसंबंध ठेवण्यासाठी अजिबात केला नाही. तर जगण्याचा तोल राखण्यासाठी आणि शांतीसाठी केला आहे, असा या व्यक्तीने सांगितलं.”

मुंबई 17 सप्टेंबर : लग्न करणं (Marriage) ही कोणत्याही व्यक्तीसाठी आनंदाची गोष्ट असते. आयुष्याच्या नव्या पर्वालाच सुरुवात होते. बहुतांश माणसं आयुष्यात एकदाच लग्न करतात. लग्नाचा दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी बरंच काही करतात. परंतु, काहीजण एकापेक्षा अधिक वेळा लग्न करतात. अर्थात, त्यामागे त्यांची वैयक्तिक कारणं असतात. अशीच एक व्यक्ती आहे जिने एक, दोनवेळा नाही तर अनेकवेळा विवाह केला आहे. या व्यक्तीच्या पत्नींची संख्या ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल. गल्फ रिपोर्टनुसार 63 वर्षांच्या अबू अब्दुल्ला हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा सौदी अरेबियामध्ये राहतो. या अबू अब्दुल्लाने एक नाही, दोन नाही तर 53 वेळा लग्न केलंय. हे ऐकून कुणीही चकीतच होईल. पण अबूला याबद्दल तसं अजिबात विशेष वाटत नाही. इतक्या वेळा लग्न करण्यामागचं त्याचं कारणही वेगळंच आहे. एका न्यूज वेबसाईटशी बोलताना तो म्हणाला, “53 वेळा विवाह हा काही मजा आणि शरीरसंबंध ठेवण्यासाठी अजिबात केला नाही. तर जगण्याचा तोल राखण्यासाठी आणि मन:शांतीसाठी मी हे विवाह केले.” मॅट्रिमोनिअल साईटवर ओळख, लग्नानंतर 8 वर्षांनी पत्नीला समजलं पतीबद्दलचं हादरवणारं सत्य अबू अब्दुल्लाने वयाच्या 20 व्या वर्षी पहिला विवाह केला. त्याची पहिली पत्नी त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी होती. अबू लग्नानंतर सुखी होता. अबूला पहिल्या पत्नीपासून मुलंही झाली. काही दिवसांनी दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. शेवटी त्याने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. 23 व्या वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं. यानंतर दोन्ही बायकांमध्ये भांडणं व्हायला लागली. या त्रासापासून अबूला सुटका हवी होती. म्हणून अबूने तिसरं आणि चौथं लग्न केलं. पण सगळ्या बायकांचं एकमेकींशी पटेनासं झालं. अबूने मग कंटाळून पहिल्या तिन्ही बायकांना घटस्फोट (Divorce) दिला. ऐकावं ते नवल! खास डासांसाठी चालवली जाते आहे ही स्पेशल Mosquito Terminator Train; पाहा VIDEO गल्फ रिपोर्टला दिलेल्या माहितीत अबू म्हणाला, इतकी लग्न करण्यामागे एकच कारण म्हणजे सुयोग्य जोडीदार शोधणं (Finding a Perfect Partner). अशी व्यक्ती जी मला समजून घेईल आणि आनंदी ठेवेल. त्याची बायकांसोबतची वागणूक चांगलीच होती. गेल्या 43 वर्षांत अबूने जी 53 लग्न केली. त्यात सौदी अरेबियाच्या महिलांसोबत काही विदेशी महिलादेखील होत्या. अबू हा व्यवसायानिमित्त वर्षाचे 3-4 महिने परदेशात असे. तिथे कामानिमित्त महिलांशी त्याचा संबंध येत असे. लग्नाशिवाय महिलेशी संबंध ठेवणं त्याला पटत नव्हतं. म्हणूनच तो या महिलांशी लग्न करायचा. अबूचं एक लग्न तर केवळ एक रात्रच टिकलं. आता त्याने एका महिलेशी लग्न केलं आहे. पण आता त्याला आणखी लग्न करण्यात रस नाही, असे तो म्हणाला. लग्न म्हणजे दोन व्यक्ती एकत्र येणं. अर्थात, दोन भिन्न व्यक्ती म्हटल्या की मतभेद, वाद हे होणारच. पण अबूने जी शक्कल शोधून काढली ती निश्चितच चक्रावून टाकणारी आहे.
First published:

Tags: Marriage, Viral news

पुढील बातम्या