बडोदा, 17 सप्टेंबर : गुजरातमधील बडोदामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. लग्नाच्या आठ वर्षानंतर एका महिलेला तिचा नवरा पुरुष नसून एक स्त्री आहे. शस्त्रक्रिया करून त्याची लिंग बदलवले, असे कळाले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या संदर्भात बडोद्यातील गोत्री पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काय आहे नेमकं प्रकरण - शीतल नावाच्या महिलेने हा एफआयआर दाखल केला आहे. महिलेने पती विजय वर्धनवर आपल्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. महिलेने विजय वर्धनवर फसवणुकीचा आरोपही केला. विजय वर्धन पूर्वी एक मुलगी होती आणि तिचे नाव विजयता होते. शीतलने पोलिसांना सांगितले की, 9 वर्षांपूर्वी तिची मेट्रोमोनियल वेबसाइटद्वारे विजय वर्धनसोबत भेट झाली होती. शीतलच्या पहिल्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. पहिल्या पतीच्या मृत्यूच्या वेळी तिला 14 वर्षांची मुलगी होती. काही काळ डेट केल्यानंतर शीतल आणि विजय वर्धन यांनी 2014 मध्ये लग्न केले. या लग्नाला कुटुंबीयांनीही हजेरी लावली होती. लग्नानंतर दोघेही हनीमूनसाठी काश्मीरला गेले होते. शीतलने सांगितले की, तिचा नवरा वैवाहिक जीवनातील बाबी करत नव्हता. तसेच तो त्यापासून पळून जाण्यासाठी निमित्त शोधायचा. शेवटी तिने शारिरिक संबंधांसाठी त्याच्यावर जेव्हा दबाव टाकला तर त्याने असे कारण दिले की, काही वर्षांपूर्वी तो रशियात असताना त्याचा अपघात झाला होता. त्या अपघातानंतर त्याने शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता गमावली आहे. एका किरकोळ शस्त्रक्रियेनंतर तो पूर्णपणे बरा होईल, असे आश्वासन त्याने महिलेला दिले. इंडिया टुडे या वेबसाईटनेही यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या अहवालानुसार, जानेवारी 2020 मध्ये त्याने सांगितले की, त्याला लठ्ठपणाची शस्त्रक्रिया करायची आहे. काही दिवसांनी जेव्हा तो बाहेर होता तेव्हा त्याने शीतलला सांगितले की, त्याने लिंग बदलण्यासाठी शस्त्रक्रिया केली होती. हेही वाचा - मामी अन् भाच्याचं जुळलं सूत, अनं नंतर मामासोबत घडलं भयानक कांड; वाचा सविस्तर यादरम्यान आरोपीने पत्नीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. यासोबतच याबाबत कोणाला काही सांगितले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. गोत्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणाले की, आरोपी दिल्लीत राहत असून त्याला बडोद्यात आणण्यात आले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर महिलेला मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.