Home /News /viral /

तोऱ्यात छातीला फटाक्यांची माळ गुंडाळून पेटवली आणि...; 'खतरों की खिलाडी' बनण्याची हौस पडली भारी

तोऱ्यात छातीला फटाक्यांची माळ गुंडाळून पेटवली आणि...; 'खतरों की खिलाडी' बनण्याची हौस पडली भारी

फटाक्यांसोबत खतरनाक स्टंट करणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं.

    मुंबई, 18 सप्टेंबर :फटाके (Firecracker) फोडायला कुणाला आवडत नाही. पण फटाके दिसायला जितके सुंदर तितकेच ते डेंजरही असतात. पण तरी किती तरी लोक या फटाक्यांशी (Firecracker video) नको तो खेळ खेळतात. कुणी हातात फटाके घेऊन फोडतं, कुणी मजेमजेत कुणाच्या तरी पाठीमागे फटाक्यांच्या माळा लावतं, तर कुणी स्वतःच अंगावर फटाक्यांच्या माळा (Firecracker on body) टाकून फोडतं. एका व्यक्तीनेतर यापुढे आणखी एक पाऊल टाकलं (Stunt with Firecracker). त्याने फटाक्यांच्या माळा शरीरावर फक्त टाकल्याच नाहीत तर घट्ट गुंडाळल्या आणि त्या पेटवल्या (Firecracker on chest). फटाके आपल्यापासून लांब फुटले तरी आपल्याला धडकी भरते. विचार करा हे फटाके अंगावर फुटले तर काय होईल. अगदी उत्साहात ही व्यक्ती असा भयंकर स्टंट (Stunt video) करायला गेली. पण हा खतरनाक स्टंट या व्यक्तीला भारी पडला (Shocking video). सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. या व्यक्तीसोबत काय झालं ते तुम्हीच पाहा. व्हिडीओत पाहू शकता, व्यक्तीच्या मानेवर फटाक्यांची माळ आहे. छाती, पोटावर त्याने फटाके गुंडाळले आहेत. एक व्यक्ती त्याच्या गळ्यातील फटाक्यांची माळ पेटवते आणि ती थोडी दूर जाते. हे वाचा - धाडसीपणा नव्हे मूर्खपणा! भरधाव ट्रेनला लटकून खतरनाक स्टंट; धडकी भरवणारा VIDEO शरीरावर फटाके गुंडाळलेली व्यक्ती आधी एकदम उत्साहात आहे, बिनधास्त दिसते आहे. पण जसे फटाके फुटू लागतात तेव्हा ती व्यक्ती हादरते. भीतीने पळू लागते. फटाके फटफट फुटत जातात ती व्यक्ती तशीच ओरडत पळू लागते आणि पुढे जाऊन जमिनीवर कोसळलेत. फटाक्यांचा धूरच धूर झालेला आहे, त्यात ती व्यक्तीची दिसत नाही. हा व्हिडीओ धक्कादायक आहे, तसाच मजेशीरही वाटतो आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बेस्ट व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Fire, Shocking viral video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या