लखनऊ 08 जून : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (2nd Wave of Coronavirus) देशात ऑक्सिजन (Oxygen) आणि रुग्णालयात बेड मिळणंही कठीण होऊन बसलं होतं. या काळातही काहींनी आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी आणि लोकांच्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी माणुसकीला काळिमा फासला. यात अनेक रुग्णालयांनीदेखील अनेकदा जिवंत रुग्णालाच मृत घोषित केल्याचंही अनेकदा समोर आलं. अशात आता आणखी एका व्हायरल व्हिडिओमुळे (Shocking Video Viral) एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ आग्रामधील पारस रुग्णालयातील आहे. यात रुग्णालयाचे संचालक डॉ. अरिंजय जैन 26 एप्रिलच्या एका घटनेचा उल्लेख करत आहेत. यात ते ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या रुग्णांवर पाच मिनिटं मॉक ड्रील आणि २२ रुग्णांचा पत्ता कट, असं बोलताना दिसत आहेत. या पत्ता कट आणि मॉक ड्रीलबाबत आता अनेक अंदाज बांधण्यात येत आहेत. तसंच रुग्णालयाविरोधात अनेकांनी आवाजा उठवला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये डॉ. अरिंजय जैन आपल्यासमोर उभा असलेल्या आणि बसलेल्या काही लोकांना 26 एप्रिलच्या त्या रात्रीची घटना सांगत आहेत. यात ते म्हणत आहेत, की आग्रामधील सर्वात मोठ्या ऑक्सिजन पुरवठादाराचा फोन आला. तो म्हणाला - कत्ल की रात है। फक्त सकाळपर्यंतचाच माल शिल्लक आहे. मुख्यमंत्रीही ऑक्सिजन मागवू शकत नाहीत. मोदी नगर- गाजियाबाद ड्राय झालं आहे. दिल्लीहूनही गाडी येत नाहीये. त्यामुळे, रुग्णांना डिस्चार्ज द्या.
5 मिनिटासाठी ऑक्सिजन बंद केला अन् 22 रुग्णांचा मृत्यू! व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ pic.twitter.com/kj47SFvCSS
— News18Lokmat (@News18lokmat) June 8, 2021
पुढे डॉक्टरनं सांगितलं, की रुग्ण्लायात कोविड आणि नॉन कोविड असे 96 रुग्ण भर्ती होते. रात्री एक वाजता रुग्णांसाठी आवश्यक सूचनेची एक नोटीस तयार केली आणि सर्व वार्डात वाचून दाखवली. व्हायरल होऊ नये म्हणून कुठेही लावली नाही. रात्री अडीच वाजता रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. लोक एकत्र येऊन एकमेकांसोबत बोलू लागले. सर्वांना समजवलं. मात्र, कोणीही जायला तयार नव्हतं. बाहेर बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचं रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितलं. रुग्ण कुठे घेऊन जाणार. सापडलं! 180 मिलियन वर्षांपूर्वीचा डायनासॉरचं अवशेष, वाचा सविस्तर जिल्हाधिकारी प्रभू एन. सिंह यांच्या म्हणण्यानुसार 26 आणि 27 एप्रिलला पारस रुग्णालयात केवळ सात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दोन दिवसात ऑक्सिजनचा थोडा तुटवडा होता. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे पारस रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले, व्हायरल व्हिडिओ 28 एप्रिलचा आहे आणि यात सांगण्यात येत असलेली 22 रुग्णांच्या मृत्यूची बातमी खोटी आहे. हे खरं आहे, की रुग्णालयात गंभीर रुग्ण होते. व्हिडिओचा तपास केला जाईल. काही चूक आढळून आल्यास कारवाईही केली जाईल, असंही ते म्हणाले