जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral News : व्यक्तीनं गिळलं ऑक्टोपस, डॉक्टरकडे पोहोचला तेव्हा भयंकर घडलं

Viral News : व्यक्तीनं गिळलं ऑक्टोपस, डॉक्टरकडे पोहोचला तेव्हा भयंकर घडलं

सोर्स : सोशल मीडिया

सोर्स : सोशल मीडिया

खरंतर रात्रीच्या जेवणाच्या वेळी आठ पायांचा प्राणी गिळल्यानंतर या व्यक्तीला रेस्टॉरेंटमध्ये उलट्या झाल्या तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 जुलै : कधी कधी घाईघाईत खाताना अन्न आपल्या घशात अडकतं. अशावेळी आपल्याला असहाय्य होतं. कधी यामुळे श्वास गुदमरतो तर कधी खोकला येतो. सिंगापूरमधील एका माणसाला असाच अनुभव आला जेव्हा तो ऑक्टोपस खात होता. हा ऑक्टोपस त्याच्या अन्ननलिकेत जाऊन अडकला. ज्यानंतर त्या व्यक्तीला गडबडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. खरंतर रात्रीच्या जेवणाच्या वेळी आठ पायांचा प्राणी गिळल्यानंतर या व्यक्तीला रेस्टॉरेंटमध्ये उलट्या झाल्या तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. Viral Video : आधी रिक्षावाल्यासोबत वाद मग महिलेला नेलं फरफटत, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद क्लिनिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी (सीजीएच) मध्ये प्रकाशित केलेल्या केस स्टडीनुसार, तो माणूस 55 वर्षांचा होता आणि जेवणानंतर डिसफॅगिया (गिळण्यात अडचण) तीव्रतेने सुरू झाल्याने टॅन टॉक सेंग हॉस्पिटलमध्ये आला होता. डॉक्टरांनी सीटी स्कॅन केले, ज्यामध्ये माणसाच्या अन्ननलिकेमध्ये खूप दाट वस्तुमान दिसून आले, ज्याला गलेट देखील म्हणतात. Viral Video : समुद्राच्या लाटांचा तांडव, पत्त्यांसारखी कोसळली इमारतीची बाल्कनी एसोफॅगोगॅस्ट्रोड्युओडेनोस्कोपी - एक लहान, लवचिक नळीचा समावेश असलेली गॅस्ट्रोइंटेस्टाइनल तपासणी केली असता नंतर असे दिसून आले की ऑक्टोपस कार्डिओएसोफेजियल जंक्शन म्हणजेच एसोफॅगस, पोटाच्या सीमेपासून 5 सेमी अंतरावर अडकला होता. त्यानंतर या व्यक्तीचे अन्न बाहेर काढण्याचे किंवा आत ढकलण्याचे प्रारंभिक प्रयत्न अयशस्वी झाले. शेवटी, डॉक्टरांनी ऑक्टोपसचे डोके पकडण्यासाठी चिमट्याचा वापर केला आणि हळूवारपणे ते रुग्णाच्या शरीरातून वर खेचून बाहेर काढले गेले. या प्रक्रियेनंतर तो माणूस बरा झाला आणि दोन दिवसांनी त्याला सोडण्यात आले. वैद्यकीय पथकाने सांगितले की, “‘पुश तंत्र’ ही उच्च यश दरासह शिफारस केलेली प्राथमिक पद्धत आहे, परंतु यावर जास्त शक्ती लागू केल्याने अन्ननलिकेला छिद्र देखील होऊ शकतो.” अशी घटना पहिल्यांदाच समोर आली नाही. न्यूयॉर्क पोस्टनुसार, 2016 मध्ये, कॅन्ससमधील एका दोन वर्षांच्या मुलाला सुशी खाल्ल्यानंतर त्याच्या घशात अडकल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात