मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking! चक्क मगरीच्या जबड्यातून बाहेर पडला तरुण; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

Shocking! चक्क मगरीच्या जबड्यातून बाहेर पडला तरुण; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

तरुणाने पाण्यात मगरीशी दिली थरारक झुंज.

तरुणाने पाण्यात मगरीशी दिली थरारक झुंज.

तरुणाने पाण्यात मगरीशी दिली थरारक झुंज.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 27 ऑक्टोबर : माणूस असो वा प्राणी (Animal attack) मगरीच्या (Crocodile attack) जबड्यात तो एकदा सापडला की त्याची सुटका नाहीच. कितीही धडपड केली तरी मगरीच्या तावडीतून सुटणं अशक्य (Man fight with crocodile). मगरीने केलेल्या शिकारीचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या व्हायरल (Viral video) होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. कारण एक तरुण मगरीच्या जबड्यातून जिवंत बाहेर पडला आहे (Man survived even after Crocodile attack).

मगरीच्या तावडीतून बचावलेल्या या तरुणाचा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. मगरीसारख्या भयंकर प्राण्याच्या जबड्यातून हा तरुण बचावतो. पाण्यात पोहायला गेलेल्या या तरुणावर मगर हल्ला करते. मग त्या तरुणाला आपली ती शिकार बनवू शकली नाही. तरुणाने मगरीशी झुंज देत स्वतःला मृत्यूच्या दारातून बाहेर काढलं आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक तरुण पाण्यात पोहोताना दिसतो आहे. त्याच्या दिशेने एक मगर येते. पाण्याबाहेर असलेल्या व्यक्तींचं लक्ष त्या मगरीवर जातं आणि ते या पाण्यातील या तरुणाला सावध करतात. त्याला पाण्यातून बाहेर यायला सांगता. तेव्हा तरुण घाईघाईने पाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. पण मगर पाण्यात इतक्या वेगाने येते की त्या तरुणाला गाठतेच. तरुणावर ती हल्लाही करते. तरुणाला जबड्यात धरते.

हे वाचा - मायलेकाला मृत्यूच्या दारातून खेचून काढलं, ते मात्र...; वॉटरफॉलवरील खतरनाक VIDEO

थोडा वेळ मगर आणि तरुण दोघंही पाण्याच्या आत असतात. कदाचित आता हा तरुण मगरीच्या जबड्यात गेलाच असंच वाटतं. पण नाही दुसऱ्याच क्षणी तरुण मगरीशी झटापट करून तिच्यापासून दूर होतो आणि पोहोत किनाऱ्याजवळ पोहोचतो आणि पाण्यातून बाहेर येतो. मगर मात्र पाण्यात जिथं आहेत तिथं तशीच दिसते.

पाण्यातून बाहेर पडलेल्या या तरुणाच्या उजव्या हाताला मगरीने आपल्या तोंडात धरलं होतं. त्याच्या त्या हाताच्या खांद्यावर जखमा झाल्याचंही दिसतं आहे. ज्यामुळे त्याला प्रचंड वेदना होत नाही. पण सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे हेच खूप आहे.

हे वाचा - प्राणीसंग्रहालयात व्यक्तीनं 11 वाघांसमोर घेतली उडी अन्...; धडकी भरवणारा VIDEO

ही घटना कधीची आणि कुठली आहे माहिती नाही. व्हायरल हॉग ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal