जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मायलेकाला मृत्यूच्या दारातून खेचून काढलं पण ते मात्र...; Tamilnadu Anaivari Waterfall वरील खतरनाक Rescue video

मायलेकाला मृत्यूच्या दारातून खेचून काढलं पण ते मात्र...; Tamilnadu Anaivari Waterfall वरील खतरनाक Rescue video

मायलेकाला मृत्यूच्या दारातून खेचून काढलं पण ते मात्र...; Tamilnadu Anaivari Waterfall वरील खतरनाक Rescue video

महिला आणि तिच्या मुलाला वाचवण्यासाठी काही लोकांनी आपला जीव धोक्यात घातला.

  • -MIN READ
  • Last Updated :

हैदराबाद, 26 ऑक्टोबर : एकिकडे वेगाने वाहणारं पाणी आणि दुसरीकडे घसणारे भलमोठे दगड. या दोघांमध्ये अडकले होते ते मायलेक. आपल्या चिमुकल्याला छातीशी कवटाळून एक आई मृत्यूच्या दारातच उभी होती (Mother baby stuck at waterfall). त्यांचं वाचणं अशक्यच वाटत होतं. पण या मायलेकाला वाचवण्यासाठी काही लोकांनी आपला जीव धोक्यात घातला (Forest staff rescue mother baby at waterfall). हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे . तामिळनाडूच्या (Tamilnadu) सालेम जिल्ह्यातील ही घटना आहे. अनायवरी वॉटरफॉलजवळ (Tamilnadu Anaivari Waterfall) एक महिला आणि तिचा मुलगा अडकले. पाण्याचा स्तर अचानक वाढल्याने महिलेला तिथून बाहेर पडता आलं नाही.  तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी काही तरुणांनी धाव घेतली. स्वतःला मृत्यूच्या दारात त्यांनी झोकलं आणि या महिलेचा आणि तिच्या मुलाचा जीव वाचवला आहे.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता, पाण्याचा वेग किती भयंकर आहे. तर दुसऱ्या बाजूला पाण्याने शेवाळ धरलेले, गुळगुळीत झालेले असे भलेमोठे दगड आहेत. या दगडांवर पाय टिकणं अशक्यच. हे वाचा -  प्राणीसंग्रहालयात व्यक्तीनं 11 वाघांसमोर घेतली उडी अन्…; धडकी भरवणारा VIDEO याच दगडांवरून काही लोक या दोघांना वाचवण्यासाठी उतरले. एकामागोमाग एक असे उभे राहिले. खडकावरून एक दोरी त्यांनी फेकली. त्यानंतर दोघं तरुण एकदम खालच्या बाजूला उतरले. आधी महिलेच्या हातातील मुलाला घेऊन त्यांनी वरच्या लोकांकडे दिलं. त्यानंतर त्या महिलेला दोरीवरून चढायला मदत केली. त्याचवेळी दोन्ही तरुण खालीच उभे होते. अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. पाण्याच्या वेगासोबत वाहू लागले. माहितीनुसार सुदैवाने ते दोघंही वाचले आहेत. कसेबसे ते किनाऱ्यावर पोहोचले. हे वाचा -  बापरे! 14 वर्षांच्या मुलाने खाल्ले 16 टूथब्रश; एक वाईट सोडवण्यासाठी भयंकर उपाय आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार महिला आणि मुलाला वाचवणारे हे वन कर्मचारी आहेत. या वन कर्मचाऱ्यांचं सर्वांनी कौतुक केलं आहे. त्यांच्या हिमतीला दाद दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात