व्हिडीओत पाहू शकता, एटीएममध्ये ती आपल्याजवळील कार्डही टाकते. कार्ड बाहेर काढते. पण यावेळी एटीएमशेजारी असलेल्या सॅनिटायझरवर त्या व्यक्तीचं लक्ष असतं. आपलं एटीएम कार्ड पाकिटात ठेवल्यानंतर ती व्यक्ती सॅनिटायझरची बाटली उचलते आणि आपल्या बॅगेत टाकते. हे वाचा - एक शेजारी, एक समोर; मगरींनी अडवला महिलेचा रस्ता अडवला आणि... पाहा Video व्हिडीओ जर तुम्ही नीट पाहिला तर ही व्यक्ती एटीएममध्ये आहे खरी. पण फक्त आपल्या एटीएम कार्डचा वापर करते. एटीएममधून पैसे वगैरे काढत नाही आणि एटीएमपेक्षा जास्त लक्ष तर त्या सॅनिटायझर बाटलीकडेच आहे. त्यामुळे खरंतर ही व्यक्ती सॅनिटायझरच चोरायला आली होती, हे स्पष्ट दिसतं. त्या व्यक्तीला वाटलं आपल्याला कुणीच पाहत नाही. पण त्याचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे वाचा - PPE किटमुळे घामानं ओला चिंब झालेल्या डॉक्टरचा फोटो व्हायरल, कॅप्शननं केलं भावुक आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. देशात लाखो एटीएम आहेत. या मूर्खांपासून सॅनिटायझर वाचवण्यासाठी आता प्रत्येक एटीएममध्ये 200-300 रुपयांचा पिंजरा लावाला लागला तर शेकडो कोटी रुपये यालाच लागतील. तुम्ही जर मर्यादेत राहिला असता तर हे पैसे वाचले असते आणि तुमच्याच भल्यासाठी वापरता आले असते. असो हम नही सुधरेंगे, असं ट्वीट काबरा यांनी केलं आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.These are kleptomaniac. 😡 देश मे लाखों ATM हैं. इन मूर्खों से सैनिटाइजर बचाने के लिए हर ATM में 200-300रु का पिंजड़ा लगाना पड़े तो सैकड़ों करोड़ रु इसी में लगेंगे.
आपके मर्यादित आचरण से ये पैसे बचते और आपकी भलाई में ही लगते... खैर... #HumNahiSudhrenge. pic.twitter.com/6zB94qV9FC — Dipanshu Kabra (@ipskabra) April 30, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Robbery, Sanitizer, Viral, Viral videos