नवी दिल्ली 30 मार्च : आईच्या मृत्यूचं दुःख प्रत्येकालाच होतं. वर्षानुवर्षे लोक या त्रासातून सावरू शकत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत जो आपल्या आईच्या जाण्याने इतका दु:खी झाला, की आईशिवाय त्याचं जगणं कठीण झालं. मग एके दिवशी त्याने मृतदेह कबरीतून बाहेर काढला. 13 वर्षे तो आईचा मृतदेह सोफ्यावर बसवून त्याच्याशी बोलायचा. आता जेव्हा लोकांना याबद्दल समजलं तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला. एल मॅरियन असं या ७६ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. एके दिवशी त्याच्या दाजीने दक्षिण-पश्चिम पोलंडमधील रॅडलिन येथे राहणाऱ्या एल मॅरियनला घराबाहेर वेड्यासारखं फिरताना पाहिले. त्याने पॅरामेडिक्सला बोलावलं. दोघेही घरात शिरले तेव्हा त्यांना पाहून आश्चर्य वाटलं. त्याच्या समोरच्या सोफ्यावर त्याच्या आईचा मृतदेह बसलेल्या अवस्थेत होता. ताबडतोब मॅरियनला घरातून दूर नेण्यात आलें. पोलीस आले. मृतदेहाची डीएनए चाचणी केली असता सगळा प्रकार उघडकीस आला. मेलेल्या माणसाला काय जाणवतं माहितीय? सत्य ऐकून उडेल चेहऱ्याचा रंग हा मृतदेह मॅरियनची आई जादविगा हिचा होता, ज्यांचं जानेवारी 2010 मध्ये निधन झालं होतं. 16 जानेवारी रोजी तिला जवळच्या कबरीत पुरण्यात आलं. जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा कबर रिकामी असल्याचं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. असं दिसतं की मॅरियनने दफन केल्यानंतर लगेचच मृतदेह खोदला आणि तो घेऊन घरी आला. घरापासून स्मशानभूमी फक्त 300 मीटर अंतरावर होती. तपासाअंती मॅरियनने मृतदेह दुचाकीवरून आणल्याचं निष्पन्न झालं. या व्यक्तीने काही केमिकल टाकून मृतदेह इतके दिवस ममी म्हणून ठेवल्याची माहिती मिळाली. शरीराला मॉथबॉलचा वास येत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने आपल्या मृत आईचा मृतदेह 13 वर्षे सोफ्यावर ठेवला होता, जेणेकरून ती टीव्ही पाहू शकेल. हा व्यक्ती मृतदेहाशी तासनतास बोलत असे. त्याला खाऊ घालण्याचाही प्रयत्न करायचा. आवाज दिल्यावरही आई काहीच बोलत नसल्याने अनेकदा तो रडायचा. ‘या’मुळे दुधाऐवजी बाळाला सूर्यप्रकाशावर जिवंत ठेवण्याचा केला प्रयोग; आई-वडिलांनीच घेतला चिमुकल्याचा जीव सध्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. स्थानिक लोक म्हणाले की त्यांना मॅरियनबद्दल फारच कमी माहिती आहे. अनेकांनी त्याला पाहिलंही नव्हतं. कारण तो दिवसा झोपायचा आणि रात्रभर जागे राहायचा. कधी कधी संध्याकाळी तो बाईकवरून कुठेतरी जायचा. एका महिलेनं सांगितलं की, तिचा नवरा म्हणायचा की हा व्यक्ती बाहेर आल्यावर सगळे घाबरायचे आणि लपायचे. दुसरा म्हणाला, जेव्हा मला कळले तेव्हा मला तासनतास झोप येत नव्हती. हे भयंकर आहे. एवढा काळ कोणी मृतदेहासोबत राहणे कसे शक्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.