मराठी बातम्या /बातम्या /Viral /

छाती ताणून वाघासमोर फोटो काढायला उभा राहिला तरुण आणि…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

छाती ताणून वाघासमोर फोटो काढायला उभा राहिला तरुण आणि…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

वाघासोबत फोटो काढण्याची डेअरिंग त्याने केली पण...

वाघासोबत फोटो काढण्याची डेअरिंग त्याने केली पण...

वाघासोबत फोटो काढण्याची डेअरिंग त्याने केली पण...

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 30 नोव्हेंबर : वाघ (Tiger video), सिंह, बिबट्या असे प्राणी (Animal video) पाहायचे असतील तर आपल्याला जंगलात, नॅशनल पार्क किंवा प्राणीसंग्रहालयात जावं लागतं. हे प्राणी समोर दिसताच धडकी भरतेच. पण त्यांच्यासोबत फोटो काढण्याच मोहही आवरत नाही. अशाच एका वाघासोबत एका तरुणाने फोटो (Man taking Photo with tiger video) काढण्याचा प्रयत्न केला. पुढे जे घडलं ते धडकी भरवणारं आहे (Tiger attacking on man video).

वाघासोबत फोटो काढणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा तरुण वाघासमोर अगदी छाती ताणून उभा राहिला. वाघ अगदी जवळ असताना त्याने फोटोसाठी त्याच्यासोबत पोझ दिली. शेवटी वाघ तो वाघच त्यानेही समोर तरुणाला पाहताच आपली शिकार आली असंच त्याला दिसलं. त्याने संधी साधून हल्ला केला.

@naturesms इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक तरुण फोटो काढायला उभा राहिला आहे. त्याच्यामागे वाघ अगदी त्याच्याजवळ आहे. त्याला पाहताच वाघ दबक्या पावलांनी त्याच्याजवळ येतो आणि अचानक त्या तरुणावर हल्ला करतो. यावेळी आपल्या काळजाचा ठोकाच चुकतो.

हे वाचा - जंगलाचा राजा सिंह आणि पर्यटकांमध्ये रंगला Tug of war; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

सुदैवाने वाघ आणि तरुणामध्ये एक काच आहे. ज्यामुळे वाघाने हल्ला केला तरी तरुणाला काही दुखापत होत नाही. पण व्हिडीओ पाहताना मात्र नक्कीच आपल्याला घाम फुटतो.

याआधीही प्राणीसंग्रहालयातील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. जिथं वाघासोबत फोटो काढत असताना वाघाने तरुणावर हल्ला केला. पण त्यापुढे जे घडलं ते धडकी भरवणारं नाही तर मजेशीर होतं.  naturebeauty8967 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती प्राणीसंग्रहालयात आहे. इथं पारदर्शी काचा बसवल्या आहेत आणि त्याच्या पलीकडे पाण्यात एक वाघ आहे. हा वाघ स्पष्टपणे दिसतो. किंबहुना त्याच्या अगदी जवळही जाता येतं. ही व्यक्तीसुद्धा काचेजवळील कठड्यावर बसते. आपल्या हातातील मोबाईल काढते आणि सेल्फी घेते. इतक्यात या व्यक्ती पाहताच वाघ दूरून पळत तिच्याजवळ येतो.

हे वाचा - भर चौकात दोन रेडे आमनेसामने, तब्बल 1 तास धुडगूस, VIDEO व्हायरल

वाघाला पाहताच व्यक्ती आपला मोबाईल वर करते आणि वाघासोबत सेल्फी काढायचा जाते. आक्रमकपणे हल्ला करायला आलेला वाघही कॅमेऱ्याकडे पाहताच शांत होतं. कॅमेऱ्यात स्वतःला पाहताच तोसुद्धा फोटोसाठी तयार होतो आणि चक्क पोझ देतो. तुम्ही पाहू शकता वाघाने काचेच्या पलीकडून या व्यक्तीच्या डोक्याला डोकं टेकवलं आहे. फोटो काढताच ती व्यक्ती तिथून उठते आणि वाघ तसाच शांतपणे त्या व्यक्तीकडे पाहत राहतो. त्यावेळी तो एखाद्या मांजरासारखाच दिसतो.

First published:

Tags: Tiger, Viral, Viral videos, Wild animal