मुंबई, 14 जुलै: लग्न (Wedding) म्हणजे मजा-मस्तीसोबतच, रुसवे-फुगवेही आलेच. एकमेकांना वरमाला घालताना नवरा-नवरीला (Bride and groom) वर उचलून धऱणं किंवा एकमेकांच्या हातात हात देताना हात थोडं मागे खेचणं.. हा लग्नातील एक मजेचा भाग असतो. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) लग्नाचा (Wedding video) असा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, जो पाहून तुम्ही हैराणच व्हाल.
लग्नात नवरीचं लाजणं मुरडणं काही नवं नाही. पण या लग्नातील नवरीने इतके नखरे दाखवले आहेत की अखेर नवऱ्याचीच सटकली आणि त्याने भरमांडवात जे केल ते पाहूनच धक्का बसेल.
View this post on Instagram
लग्नात नवरा-नवरीचे मित्रमैत्रिणी, भाऊ-बहीण मैफल लुटतात. पण या लग्नात नवरा-नवरीने असं काही केलं आहे जे पाहून लोक हैराण झाले आहेत.
हे वाचा - करवल्यांऐवजी वराच्या मित्राने लुटली लग्नाची मजा; असं काही केलं की नजर हटणार नाही
व्हिडीओत पाहू शकता लग्नाच्या विधी चालू आहेत. नवरीच्या भांगेत कुंकू भरायचं आहे. पण नवरी ते करायला देत नाही. अचानक ती नखरे करू लागते. आपल्या डोक्यावरील पदरच हटवत नाही. तिचे नातेवाईक हातात कुंकू घेऊन दिसतात, तिला मनवण्याचा प्रयत्न करतात. पण नवरी काय ऐकण्याच्या तयारीत नाही. नवरी आपल्या हट्टावर ठाम आहे. नवरीचे इतके नखरे पाहून नवऱ्याची सटकली. नवरा संतापाने लाल झाला. तो लगेच उठून उभा राहतो आणि त्यानंतर नवरी जमिनीवरच बेशुद्ध झाल्यासारखं करते. त्यानंतर नवऱ्याला राग अनावर होतो आणि तो आपल्या डोक्यावरील फेटा काढून फेकतो. गळ्यातील वरमाला तोडून टाकतो आणि मांडवातून पळ काढतो. नवरीकडील नातेवाईक नवऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण काहीच फायदा होत नाही. तो तिथून सुसाट सुटतो. यामुळे नवरीच्या नातेवाईकांना रडूच कोसळतं.
हे वाचा - अरेच्चा! तोंडातली शिकार तिथंच सोडून बिबट्याने ठोकली धूम; नेमकं असं काय घडलं?
पण नवऱ्याचा असा अवतार पाहून तुम्हाला मात्र हसू आलं असेल. लग्नात असं कोण करतं का? असंच तुम्हीही म्हणाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नेटिझन्स यावर मजेशीर कमेंट देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral video., Wedding video