मुंबई, 10 मार्च : साप (Snake video) म्हटलं तरी आपल्याला दरदरून घाम फुटतो. अशा सापाला पाणी पाजणं दूर आपण त्याच्या जवळ जाण्याचीही हिंमत करणार नाही. पण एका तरुणाने तशी डेअरिंग केली. त्याने चक्क सापाला पाणी पाजलं आहे. त्यातही धक्कादायक म्हणजे त्याने सापाला स्वतःच्या हाताने पाणी पाजलं आहे (Thirsty snake drink water). हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सापाला पाणी पाजणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. आता उन्हाळा सुरू होईल. उकाडा हळूहळू जाणवू लागला आहे. त्यामुळे शरीराची पाण्याची गरज वाढते आहे. फक्त माणसंच नाही तर मुके जीवही यावेळी तहानेने व्याकूळ होतात. पाण्याच्या शोधात सर्वत्र भटकतात. आपण आपल्या घराच्या बाल्कनीत, खिडकीत पक्ष्यांसाठी तर घराबाहेर किंवा अंगणात प्राण्यांसाठी एखाद्या भांड्यात पाणी ठेवतो. जे पाणी पिऊन मुके जीव आपली तहान शमवतात. मुक्या जीवांवर आपलं कितीही प्रेम असलं. त्यांनाही तहान लागते, त्यांनाही पाणी द्यायला हवं याची जाणीव आपल्याला असली आणि आपण तसं करतही असलो तरी सापाला पाणी पाजण्याची हिंमत तुमची होईल का? पण या तरुणाने तसं केलं. हे वाचा - शिकारीला आलेल्या मगरीची माकडांनी केली भयंकर अवस्था; पुन्हा कधीच घेणार नाही पंगा तहानेने व्याकूळ झालेला साप या तरुणाला दिसला. त्यानंतर त्याला राहवलं नाही. या सापाची तहान शमवण्यासाठी त्याने आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही. आपल्याजवळील पाण्याच्या बाटलीतील पाणी त्याने सापाला दिलं. आता त्याने पाण्याची बाटली सापाच्या तोंडाजवळ लावली किंवा एखाद्या भांड्यात ते पाणी दिलं तर असंही नाही. या व्यक्तीने बाटलीतील पाणी आपल्या हातात ओतलं आणि हाताने ते पाणी सापाला पाजलं.
Summer is approaching. Your few drops can save someone’s life. Leave some water in your garden in a container for that can mean a choice between life & death for many animals🙏 pic.twitter.com/ZSIafE4OEr
— Susanta Nanda (@susantananda3) March 9, 2022
व्हिडीओत पाहू शकता हिरव्या रंगाचा साप झाडाला लटकलेला आहे. हा साप त्या व्यक्तीच्या हातातील पाणी गटागटा पिताना दिसतो आहे. एरवी माणूस जवळ येताच दंश करणारे हे साप. पण पाणी पाजणाऱ्या व्यक्तीचा हात जवळ येऊनही त्याला न चावता गटागटा पाणी पिताना दिसतो आहे. व्हिडीओ पाहूनही डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हे वाचा - VIDEO-हत्तीने किक मारताच चवताळली म्हैस; पुढे जे घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. उन्हाळा येत आहे. तुमचे काही थेंब कुणाचा तरी जीव वाचवू शकता. तुमच्या बागेत एखाद्या भांड्यात थोडंसं पाणी ठेवा. कारण कित्येक प्राण्यांसाठी जीवन आणि मृत्यू यामध्ये हा एक पर्याय असू शकतो.