व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की डझनभर विषारी कोब्रा साप एकाच जागी बसले आहेत. मग एक व्यक्ती तिथे येऊन झोपतो. आपण पाहू शकता की हा व्यक्ती या धोकादायक सापांमध्ये झोपण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान सर्व काळे नाग त्याच्या दिशेने जाताना दिसतात. एवढंच नाही तर यातील अनेक साप व्यक्तीला सतत चावत राहतात. पण त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही. बापरे! श्वानाच्या तोंडात घुसला जगातील सर्वात विषारी साप; वाचवण्यासाठी मालकिणीने हात टाकला अन्... weirdvidz नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका भयानक आहे की तो पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. हा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होताच व्हायरल झाला आहे. लोकांना व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटलं आहे, की कोणी माणूस असं कसं करू शकतो. साप चावल्यानंतरही ती व्यक्ती त्याकडे दुर्लक्ष करून झोपी जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं तुम्ही पाहू शकता. व्यक्तीच्या गळ्यालाही सापांनी वेढा घातला आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Poisonous cobra, Snake video