मुंबई, 24 मे : पिसाळलेला घोडा, रेडा, बैल यांना आवरणं म्हणजे मोठं आव्हानच आहे. अशा प्राण्यांच्या जवळही कुणी जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि गेलं तरी त्याचं काय होईल, या कल्पनेनंच घाम फुटतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Social media viral video) होतो आहे. ज्यात एका व्यक्तीने पिसाळलेल्या रेड्यावर रायडिंग (Riding on bull) करण्याचा प्रयत्न केला. पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल (Shocking video). पिसाळलेल्या प्राण्यांसमोह जाणं, त्यांना आवरण्याचा प्रयत्न करणं यासाठी ़मोठं धाडस हवं. त्यातही तो प्राणी आवरला नाही, तो जास्तच आक्रमक झाला तर त्या व्यक्तीच्या जीवावरही बेतू शकतं. पण काही जण तर अगदी खेळ म्हणून अशा प्राण्यांवर रायडिंग करण्याचा प्रयत्न करतात. तसाच हा व्हिडीओ आहे.
#महिषासुर #कोरोना से बचने का उपाय -
— Rupin Sharma IPS (@rupin1992) May 21, 2021
दोनों #VACCसिंगों को मत छोड़ना #VACCINATE PLS@hvgoenka @ipskabra @ipsvijrk @hussain_imtiyaz @arunbothra @sanjg2k1 @ParveenKaswan pic.twitter.com/xXWM6P7Hpd
व्हिडीओत पाहू शकता, रेड्याला दोरीने बांधण्यात आलं आहे. एका व्यक्तीच्या हातात ही दोर आहे. तर दुसरी व्यक्ती या रेड्याच्या शिंगांना धरून त्याच्या मानेवर बसते. हे वाचा - Shocking:कोरोनासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा मृत्यू, अंत्यसंस्कारात गर्दी रेड्याच्या शिंगाला व्यक्तीने धरताच रेडा पिसाळतो. तो जोरजोरात आपली मान हलवतो. व्यक्ती तेव्हा पडणारही असते, पण सुदैवाने तो रेड्यावर बसण्यात यशस्वी होतो. त्यानंतर मात्र रेडा त्या व्यक्तीला पाडण्याचा प्रयत्न करतो. आपली मान, डोकं, शिंगं जोरजोरात हलवतो. पण व्यक्ती त्या रेड्याची दोन्ही शिंग घट्ट धरून त्यावर बसून राहते. रेडा मान हलवतो तशी ती व्यक्तीही खाली वर होते. जणू ती रेड्याच्या शिंगावर झोकेच घेते अशी वाटते. पण रेड्यावरून काही ती व्यक्ती खाली पडत नाही. हे वाचा - शिकारीच्या शोधात झाडावर चढला बिबट्या, कळपाने आलेली हरणं पाहिली आणि…पाहा VIDEO आयपीएस रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अगदी धडकीच भरते. व्हिडीओ पाहून तशाच शॉकिंग प्रतिक्रिया येत आहेत. असं करण्यासाठी मोठं धाडस हवं, अशाच कमेंट यावर येत आहे. सर्वांनी या तरुणाच्या हिमतीला दाद दिली आहे.