मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरेच्चा हा तर हॅरी पॉटर! तरुणाचा हात आहे की जादूची कांडी; Magic video पाहून थक्क व्हाल

अरेच्चा हा तर हॅरी पॉटर! तरुणाचा हात आहे की जादूची कांडी; Magic video पाहून थक्क व्हाल

तरुणाने विमानतळावर करून दाखवली भन्नाट जादू.

तरुणाने विमानतळावर करून दाखवली भन्नाट जादू.

तरुणाने विमानतळावर करून दाखवली भन्नाट जादू.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 24 डिसेंबर : तुम्ही हॅरी पॉटर (Harry potter) पुस्तक वाचलं असेल, फिल्म तर नक्कीच पाहिली असेल. या फिल्ममध्ये आपण जादूची दुनिया पाहिली (Magic video). असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्याला माहिती असलं तरी आपल्याला अशी जादू पाहायला नक्कीच आवडते. सध्या अशाच एका तरुणाचा मॅजिक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्याला पाहून बहुतेकांना हॅरी पॉटरचीच आठवण झाली आहे. हा व्हिडीओ एका एअरपोर्टवरील आहे. विमानतळाच्या लगेच सेक्सशजवळ काही लोक आपलं सामान घेण्यासाठी उभे आहेत. तिथंच एक लाल जॅकेट घातलेला तरुणही दिसतो आहे. तो चक्क आपल्या हातांनी बॅग कंट्रोल करताना दिसतो. म्हणजे बॅग त्याच्या इशाऱ्यावरच चालताना दिसतात. व्हिडीओत पाहू शकता समोरून बॅग येत असते तेव्हा ही व्यक्ती आपला हात दाखवून थांबायला सांगते, तेव्हा ती बॅग तिथंच थांबते. त्यानंतर जेव्हा ही व्यक्ती बॅगेला हाताने ये असं खुणावते, तेव्हा ती थांबलेली बॅग खाली पडते. हे वाचा - कसं शक्य आहे? KitKat Chocolate ने कापला टोमॅटो; VIDEO पाहून नेटिझन्स हैराण viralhog नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तू जादूगार आहेस का? असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे. त्यांनी लाइक केला आहे आणि आपल्या कमेंटही दिल्या आहेत. काही युझर्सनी याला हॅरी पॉटरच म्हटलं आहे. तर काही युझर्सनी तरुणाने ही कमाल नक्की केली कशी याची पोलखोल केली आहे.
View this post on Instagram

A post shared by ViralHog (@viralhog)

एका युझरने सांगितलं की व्यक्ती कोणती जादू दाखवत नाही आहे. तर लगेच बेल्टमध्ये एक सेन्सर असतं. जे जेव्हा तुमचं सामान खाली पडतं तेव्हा वरील कन्वेअर बंद करतं. असं असलं तरी एका युझरने मात्र ही व्यक्ती सामान पडणार असा अगदी अचूक अंदाज कसा लावते, याचंही आश्चर्य व्यक्त केलं आहे. हे वाचा - कारमध्ये झोपलेल्या नवरीसोबत असं काही केलं की...; नवरदेवाचा प्रताप कॅमेऱ्यात कैद तुमची या व्हिडीओबाबत काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला आमच्या सोशल मीडिया बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.
First published:

Tags: Shocking viral video, Viral, Viral videos

पुढील बातम्या