मुंबई, 24 डिसेंबर : चॉकलेट (Chocolate) जे साधं हातात घेतलं तरी तुटतं, विरघळतं. अशा चॉकलेटचा चाकू म्हणून वापर केला हे सांगून साहजिकच विश्वास बसणार नाही. हे शक्यच नाही, असंच तुम्ही म्हणाल. पण एका व्यक्तीने ही अशक्य गोष्टही शक्य करून दाखवली आहे. त्याने चक्क किटकॅट (KitKat) चॉकलेटने टोमॅटो कापून दाखवला आहे (Man cut tomato using kitkat chocolate). किटकॅटने टोमॅटो कापतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण हैराण झाला आहे. हे कसं काय शक्य आहे, या व्यक्तीने हे नेमकं केलं तरी कसं असाच विचार सर्वजण हैराण आहेत. तुम्हाला पाहिल्याशिवाय हे खरं वाटणार नाही. मग व्हिडीओच पाहा. हे वाचा - कारमध्ये झोपलेल्या नवरीसोबत असं काही केलं की…; नवरदेवाचा प्रताप कॅमेऱ्यात कैद व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती चक्क किटकॅट चॉकलेटला धार काढताना दिसते. जशी चाकूला धार काढावी तशी या चॉकलेटला धार काढली जाते.
त्यानंतर ही व्यक्ती एक टोमॅटो घेते आणि तो धार काढलेल्या किटकॅट चॉकलेटने कापायला जाते. तुम्हाला हे पाहून हसायला येईल. चॉकलेटने कधी काही कापता येईल का, असं तुम्ही म्हणाल. पण व्यक्ती पुढे जी कमाल दाखवतो ते पाहून तर तुम्ही तुमचे डोळेच चोळत बसाल. कारण आपण विचारही करू शकत नाही, ते याने प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. चॉकलेटत्या मदतीने त्याने टोमॅटोच चक्क दोन तुकडे केले आहेत. हे वाचा - Shocking! प्रसिद्ध फूड कंपनीकडून मागवलं चिकन; ग्राहकाला डब्यात काय सापडलं पाहा @whathowwhystudio इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

)







