मुंबई, 24 डिसेंबर : लग्नानंतर (Wedding Videos) धूम असते ती वरातीची. नवरा-नवरी (Bride groom video) दोघंही गाडीत बसतात आणि वाजतगाजत त्यांची वरात काढली जाते. पण बऱ्याच वेळा लग्नाच्या गडबडीत नवरा-नवरी इतके थकलेले असतात की गाडीत बसताच (Bride groom car video) वरातीतच त्यांना डुलकी लागते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात एका नवरीला कारमध्येच झोप लागली. त्यावेळी नवरदेवाने भलताच प्रताप केला. कारच्या मागच्या सीटवर नवरा-नवरी बसलेले होते. दमलेल्या नवरीला गाढ झोप लागली. त्यावेळी नवरदेवाने नवरीबाईसोबत असं काही केलं की पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. नवरदेवाचा हा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता कारच्या बॅकसीटवर नवरा-नवरी शेजारी बसलेले दिसत आहेत. नवरी सासरी पोहोचण्याआधीच तिला डुलकी लागली. त्याचवेळी नवरदेवाने चान्स मारला. हे वाचा - भारीच! अंतराळात अशी होते हजामत; Space मधील Hair saloon चा Video एकदा पाहाच नवरीला गाढ झोपलेलं पाहून नवरदेवाने आपल्या खिशातील रूमाल काढला आणि तिच्या चेहऱ्यावर फिरवला. नवरदेवाचं हे कृत्य पाहून तो नेमकं काय करतो आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
खरंतर नवरदेव नवरीबाईच्या चेहऱ्यावरचा मेकअप पुसतो आहे. नवरीबाईने इतका मेकअप केला आहे की लग्नानंतर तो निघू लागला आहे. मेकअप निघताच नवरीचं खरं रूप समोर आलं. तेव्हा नवरदेवालाही हसू आवरलं नाही. ती झोपताच त्याने तिच्या चेहऱ्यावरील मेकअप पुसण्याचा प्रयत्न केला. तितक्यात नवरीलाही जाग आली. हे वाचा - डीजेवर डान्स करत होते आजोबा; इतक्यात काठी घेऊन आल्या आजीबाई अन्…, मजेशीर VIDEO nation.video इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.