पाटणा 21 जून : एका गावात प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराला पतीने पत्नीच्या खोलीत पकडल्याची घटना समोर आली आहे. त्याने याचा व्हिडिओ बनवल्यानंतर पोलीस ठाण्यात माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही पोलीस ठाण्यात नेलं. 25 मे रोजीच तरुणीचं लग्न झालं होतं, शुक्रवारी रात्री नवविवाहितेचा पती गावात एका तिलकोत्सवाच्या कार्यक्रमाला गेला होता, त्यानंतर नवविवाहितेनं त्यांच्याच गावातील आधीच्या प्रियकराला गुपचूप घरी बोलवलं. यादरम्यान तिचा पती रात्रीच घरी आली आणि संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. ही घटना बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील भोजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पतीने सांगितलं की तो एका कार्यक्रमाला गेला होता. कार्यक्रम आटोपून परत आल्यानंतर त्याने घराचा दरवाजा उघडण्यास सांगितलं. मात्र, दरवाजा उघडण्यास बराच वेळ लागला. यावर त्याला थोडी शंका आली. यादरम्यान दार उघडल्यावर पत्नीने कपडे घालण्याच्या बहाण्याने खोलीतील लाईट बंद केल्या आणि त्याला लवकर झोपण्यास सांगू लागली. मात्र काहीतरी वेगळाच प्रकार घडल्याची शंका येताच पतीने लाईट चालू केली. यादरम्यान खोलीत आणखी एक व्यक्ती लपल्याचं दिसलं. संशय घेत केला नवऱ्याचा पाठलाग, अखेर तो अशा ठिकाणी पोहोचला पाहून बायकोला बसला धक्का यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना बोलवून या सगळ्याचा व्हिडिओ बनवून पत्नीच्या माहेरकडील लोकांना याची माहिती दिली. यासोबतच पोलिसांनाही माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलीस तरुणाला आणि त्याच्या प्रेयसीला सोबत घेऊन गेले. तिथे डुमरावच्या डीएसपीने पतीला समजवल्यानंतरही तो पत्नीला सोबत ठेवण्यास तयार नव्हता. यानंतर नवविवाहित महिलेला तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं. अटक करण्यात आलेल्या प्रियकराची रविवारी तुरुंगात रवानगी करण्यात आली, अशी माहिती भोजपूर पोलीस स्टेशनचे स्टेशन हेड सुबोध कुमार यांनी दिली . याप्रकरणी नवविवाहितेच्या वडिलांनी म्हटलं की, त्यांनी आमच्या मुलीला कट रचून यात फसवलं आहे. दुसरीकडे, या प्रकरणाबाबत डीएसपी अफाक अन्सारी यांनी सांगितलं की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवविवाहित महिलेला तिच्या वडिलांसोबत पाठवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.