जाहिरात
मराठी बातम्या / Viral / संशय घेत केला नवऱ्याचा पाठलाग, अखेर तो अशा ठिकाणी पोहोचला पाहून बायकोला बसला धक्का

संशय घेत केला नवऱ्याचा पाठलाग, अखेर तो अशा ठिकाणी पोहोचला पाहून बायकोला बसला धक्का

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Husband wife : आपला नवरा आपली फसवणूक करत असल्याचा संशय होता. ज्यामुळे महिलेनं आपल्या नवऱ्याचा पाठलाग करण्याचं ठरवलं. त्यावेळी धक्कादायक सत्य तिच्या समोर आलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 11 जून : प्रत्येक नात्यामध्ये भांडणं होतातच. मग ते नवरा बायकोच्या नात्याला ही लागू होतं. पण कितीही झालं तरी त्या भांडणाला विसरुन किंवा त्याच्यावर मार्ग काढत पुढे गेलं की नातं चांगलं फुलतं. त्यामुळे नवरा-बायकोमध्ये नेहमीच मैत्रीचं नातं असावं. असं असलं तरी कधी कधी त्याच्या आयुष्यात असा प्रसंग येतो की ज्यामुळे विश्वासाला तडा जाते. ज्यामुळे एक जोडीदार दुसऱ्यावर संशय घेऊ लागतो. असाच काहीसा प्रकार एका जोडप्यासोबत घडला. एका महिलेला आपला नवरा आपली फसवणूक करत असल्याचा संशय होता. ज्यामुळे तिने आपल्या नवऱ्याचा पाठलाग करण्याचं ठरवलं. एक दिवस ती नवऱ्याचा पाठलाग करत मसाज पार्लरमध्ये पोहोचली. येथे तिने नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडले. यानंतर बायकोने त्या महिलेला बेदम मारहाण केली. ही घटना थायलंडमधील फुकेतची आहे. बायको प्रियकरासोबत बेडवर असताना कॅमेरा घेऊन पोहोचला नवरा आणि… Video कैद झाला संपूर्ण प्रकार तेथील लोकल मीडियारिपोर्टनुसार थाई महिलेला तिच्या नवऱ्याचे अफेअर असल्याचा संशय होता. तिने आपल्या नवऱ्याची पर्स तपासली तेव्हा तिच्या शंकेचे रूपांतर आत्मविश्वासात झाले. या महिलेच्या नवऱ्याच्या पर्समध्ये त्याच्या मसाज पार्लरच्या पावतीसोबत दुसऱ्या महिलेसोबत फोटो होता. याबद्दल, महिलेने एका स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले - “मला माझ्या पतीच्या अशा वागण्याचे पुरावे त्याच्या पर्समध्ये सापडले. अशा परिस्थितीत तो कुठे जातो हे जाणून घेण्यासाठी मी पाठलाग केला. तपासाअंती तो मसाज पार्लरमध्ये जाऊन दुसऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत असे. हे जाणून मला भीती वाटली कारण तो लैंगिक संक्रमित आजार घरी आणू शकतो.” भरमंडपात नवरदेवाचं विचित्र कृत्य, नववधूला जवळ घेतलं आणि…. पाहा Viral Video पुढे महिलेने सांगितले की ती जेव्हा नवऱ्याच्या मागून गेली, तेव्हा तिने तिच्या पतीला दुसऱ्या महिलेशी जवळीक साधताना पाहिले. हे पाहून ती संतापली आणि त्या महिलेवर तुटून पडली. तिने नंतर तिच्यावर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव केला आणि केस ओढून महिलेला जमिनीवर पाडले. दरम्यान, कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात