जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जंगलाच्या राजाच्या हद्दीत घुसली मगर, सिंहाची शिकार पळवण्याचा प्रयत्न; पुढे काय घडलं पाहा VIDEO

जंगलाच्या राजाच्या हद्दीत घुसली मगर, सिंहाची शिकार पळवण्याचा प्रयत्न; पुढे काय घडलं पाहा VIDEO

सिंह आणि मगरीची फायटिंग. (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)

सिंह आणि मगरीची फायटिंग. (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)

सिंह आणि मगरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जुलै : सिंह हा जंगलाचा राजा तर मगरीचं राज्य पाण्यात. तसं सिंह जंगलाचा राजा असला तरी पाण्यात मात्र तो मगरीशी वैर घेत नाही. अशा या मगरीने पाण्याबाहेर येत सिंहाच्या हद्दीत शिरकाव केला. सिंहाच्या क्षेत्रात घुसून तिने सिंहाची शिकार पळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे घडलं ते थरारक आहे. सिंह आणि मगरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका मगरीने सिंहाच्या हद्दीत घुसून त्याची शिकार पळवण्याचा प्रयत्न केला. हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सिंहांनी आपली शिकार करून ठेवली आहे. एका म्हशीला त्यांनी ठार केलं आहे. इतक्यात तिथं एक भुकेली मगर येते. ती सिंहांच्या शिकारीवर तोंड मारण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी सिंह पाहतात आणि तिच्या जवळ येतात. OMG! बिबट्याने हवेत उडत केली शिकार; आजवर कधीच पाहिला नसेल असा शिकारीचा थरार; Video Viral पाण्यात मगरीचं राज्य त्यामुळे तिथं सिंहही तिला घाबरतो. पण जंगलात जमिनीवर मात्र सिंहच राजा, त्यामुळे इथं तो मगरीला घाबरला नाही. आधी एका आणि नंतर दुसऱ्या सिंहाने मगरीला पळवण्याचा प्रयत्न केला. नंतर दोघांनीही मगरीला घेरलं आणि एकएक करून मगरीवर हल्ला करू लागले.  मगरही त्यांच्यासमोर कमी पडली नाही ती एकटी दोन सिंहांशी झुंज देत राहिली. जंगलात एकाच शिकारासाठी भिडलेल्या दोन शिकाऱ्यांमधील लढाईचं हे थरारक दृश्य पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एकमेकींच्या जीवावर उठल्या दोन मगरी; खतरनाक फायटिंगचा VIDEO VIRAL युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एका युझरने हा व्हिडीओ पाहिल्यावर सिंह खरोखरच जंगलाचा राजा आहे, असं म्हटलं आहे. तर एकाने मगरीच्या हिमतीलाही दाद दिली आहे.

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात