नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर: पाण्यात बुडणाऱ्या कुत्र्याला एका व्यक्तीनं जीवावर खेळत वाचवल्याची घटना (Man saved sinking dog with his motor boat video goes viral) समोर आली आहे. सोशल मीडियावर कुत्र्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कुत्रा करामती करत असल्याचे, कधी उड्या मारत असल्याचे तर कधी कुत्र्यासोबत काही घडतानाचे अऩेक व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ (Dog resuced by man) आहे कुत्र्याला संकटातून वाचवण्याचा. कुत्रा पडला पाण्यात
व्हिडिओत एक कुत्रा पाण्यात अडकल्याचं दिसतं. पाण्यात हा कुत्रा गटांगळ्या खात असून मदतीची प्रतीक्षा करत असल्याचं दिसतं. त्याला वाचवायला आता कोण येणार, असा प्रश्न व्हिडिओ पाहणाऱ्याला पडतो. पाण्यात गटांगळ्या खाणारा हा कुत्रा आता वाचणार की नाही, असा प्रश्न पडला असतानाच एका बोटीतून त्याला वाचवायला एक व्यक्ती आल्याचं दिसतं. बोटीतून वाचवले प्राण एका मोटरबोटीतून आलेल्या व्यक्तीने कुत्र्याचे प्राण वाचवले. पाण्यात गटांगळ्या खाऊ लागलेल्या कुत्र्यापाशी ही व्यक्ती बोट घेऊन आली. आपल्याला वाचवण्यासाठी माणूस आला आहे, यावर सुरुवातीला कुत्र्याचा विश्वासच बसत नसल्याचं त्याच्या एक्सप्रेशन्सवरून दिसतं. त्यानंतर ही व्यक्ती कुत्र्याला अलगद त्याच्या बोटीत ओढून घेते. गारठलेला आणि घाबरलेला कुत्रा बोटीच्या एका टोकावर शांतपणे थरथरत बसून राहतो. त्यानंतर ही व्यक्ती बोट घेऊन जलाशयातून बाहेर येते, असं या व्हिडिओत दिसतं. हे वाचा- महिनाभर केली ड्युटी, मग त्याच पोलीस ठाण्यात झाली अटक; वाचा तोतया पोलिसाची गोष्ट व्हिडिओवर अऩेक कमेंट्स या व्हिडिओवर नेटिझन्सकडून अनेक कमेंट्स आल्या आहेत. कुत्र्याला वाचवण्याचा निर्णय़ घेतल्याबद्दल या व्यक्तीचे अनेकांनी आभार मानले आहेत. तर या व्हिडिओतून मानवतेचा संदेश मिळत असल्याचंही काहींनी म्हटलंय. या व्हिडिओला आतापर्यंत 3 कोटींहून अधिक लोकांनी पाहिलं असून 10 लाखांपेक्षा अधिक जणांनी त्याला लाईक केलं आहे.