मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

महिनाभर केली ड्युटी, मग त्याच पोलीस ठाण्यात झाली अटक; वाचा तोतया पोलिसाची गोष्ट  

महिनाभर केली ड्युटी, मग त्याच पोलीस ठाण्यात झाली अटक; वाचा तोतया पोलिसाची गोष्ट  

पोलिसांची वर्दी घालून इतर पोलिसांसोबत कर्तव्य बजावणाऱ्या तोतया पोलिसांनी (Police arrested bogus police perfomed duty for a month) अटक करण्यात आली आहे.

पोलिसांची वर्दी घालून इतर पोलिसांसोबत कर्तव्य बजावणाऱ्या तोतया पोलिसांनी (Police arrested bogus police perfomed duty for a month) अटक करण्यात आली आहे.

पोलिसांची वर्दी घालून इतर पोलिसांसोबत कर्तव्य बजावणाऱ्या तोतया पोलिसांनी (Police arrested bogus police perfomed duty for a month) अटक करण्यात आली आहे.

    पटना, 3 नोव्हेंबर : पोलिसांची वर्दी घालून इतर पोलिसांसोबत कर्तव्य बजावणाऱ्या तोतया पोलिसांनी (Police arrested bogus police perfomed duty for a month) अटक करण्यात आली आहे. प्रत्यक्ष पोलीस नसतानाही एक तरुण पोलीस स्टेशनला रुजू झाला आणि कर्तव्य बजावू लागला. मात्र हा खरा पोलीस नसून तोतया असल्याचं जेव्हा लक्षात (Senior police officers shocked to know reality) आलं, तेव्हा त्याच्या वरिष्ठांना चांगलाच धक्का बसला. असा झाला रुजू बिहारमधील खगडियाच्या मानसी पोलीस ठाण्यात विक्रम कुमार नावाचा एक तरुण हवालदार म्हणून रुजू झाला. आपल्या नियुक्तीचं पत्र काही तांत्रिक कारणांमुळे अडकलं असून लवकरच ते पोलीस स्टेशनला येईल, असं त्यांने वरिष्ठांना सांगितलं. या बाबीवर विश्वास ठेऊन वरिष्ठांनी त्याला ड्युटीवर तैनात केलं. पोलिसांना जी वेगवेगळ्या प्रकारची कामं दिली जातात, तीच कामं विक्रमलाही दिली जात होती. पोलिसांसोबत केली कामे गुन्हेगाराला अटक करणे, धाडी टाकणे, सुरक्षा पुरवणे, पेट्रोलिंग करणे यासारखी पोलिसांची नेहमीची कामं विक्रमही करत होता. मात्र तो खरा पोलीस नसल्याचा संशयेखील कुणाला आला नाही. अनेक दिवस तो पोलिसांसोबत सीसीटीव्ही चेकिंगचंही काम करत असल्याची माहिती पुढं आली आहे. असं फुटलं बिंग मानवाधिका कार्यकर्ते मनोज मिश्रा यांनी विक्रम कुमारला पाहिलं आणि त्यांना संशय आला. त्यांनी एसपींना याची माहिती दिली आणि विक्रमबाबत चौकशी करायला सांगितलं. विक्रम पोलिसांच्या वेषात फिरत असल्याचे फोटेोही त्यांनी सोशल मीडियात व्हायरल केले. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता विक्रम सिंहची पोलीस म्हणून नियुक्तीच झाली नसून आपल्याला खोटी माहिती देण्यात आल्याचं समजलं. त्यानंतर ज्या पोलीस ठाण्यात तो कर्तव्य बजावत होता, त्याच पोलीस ठाण्यात त्याला अटक करण्यात आली. हे वाचा- PHOTOS: भारतातील ती ठिकाणं जिथे कधीच साजरी होत नाही दिवाळी; वाचा कारण विक्रमलाही बसला धक्का विक्रमलाही या प्रकारानं चांगलाच धक्का बसला असून त्याची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंगेरमधील एका इसमानं आपल्याकडून पैसे घेऊन पोलिसांत नोकरी लावण्याचं आश्वासन दिल्याचं तो सांगतो. आपली पोलीस हवालदार म्हणून नियुक्ती निश्चित झाली असल्याचं सांगत त्याने आपल्याला ओळखपत्र आणि इतर कागदपत्रं पुरवल्याचा दावा त्यानं केला आहे. नियुक्तीचं पत्र थोड्याच दिवसात मिळेल, अशी माहिती वरिष्ठांना देण्यासही याच इसमानं विक्रमला सांगितलं होतं. या घटनेमुळे बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bihar, Crime, Police

    पुढील बातम्या