जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हजारो फूट उंच दोरीवरून चालताना खाली कोसळला तरुण आणि...; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

हजारो फूट उंच दोरीवरून चालताना खाली कोसळला तरुण आणि...; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

हजारो फूट उंच दोरीवरून चालताना खाली कोसळला तरुण आणि...; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

हजारो फूट उंचावरील दोरीवरून चालताना व्यक्तीसोबत घडलेला संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 जानेवारी : तुम्ही डोंबाऱ्यांचा खेळ कधी ना कधी पाहिलाच असेल. दोन खांबाना बांधलेल्या एका दोरीवर हातात काठी घेत चालणारी मुलगी. जिचा थोडा जरी तोल ढासळला तरी आपल्या काळजाचा ठोका चुकायचा (Walking on rope). सर्कशीतही अशा चित्तथरारक कसरती तुम्ही पाहिल्या असतील. विचार करा, अशी दोरी हजारो फूट उंचीवर असेल आणि त्यावरून कुणी चालताना त्याचा तोल गेला तर काय होईल? (Man walks on rope) असाच धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडयावर व्हायरल होतो आहे. अर्थपिक्स नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आळा आहे (Man walking on rope in sky video). ज्यावर एक व्यक्ती हजारो फूट उंचीवर असलेल्या दोरीवर चालण्याचा प्रयत्न करत होती. व्हिडीओत पाहू शकता एका दोरीला दोन्ही बाजूंनी पॅराशूटला लटकलेल्या व्यक्तींनी पकडलं आहे. त्या दोरीवर एक व्यक्ती आधी बसलेली दिसते. त्यानंतर ती त्या दोरीवर उभी राहून चालण्याचा प्रयत्न करते. कशीबशी ती व्यक्ती उभी राहते आणि पुढे पाऊल टाकणार तोच त्या व्यक्तीचा तोल ढासळलतो. ती व्यक्ती दोरीवरून घसरते आणि थेट खाली कोसळते. हे वाचा -  खेळता-खेळता स्विमिंग पुलमध्ये कोसळली चिमुकली अन्..; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हिडीओत ती व्यक्ती किती खाली कोसळली हे दाखवण्यात आलं नाही. पण ती किती उंचावरून खाली कोसळली आणि कशी कोसळली हे मात्र व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. पण सुदैवाने या व्यक्तीच्या पाठीवर पॅराशूटची बॅग असल्याचंही दिसतं आहे, त्यामुळे तिला काही दुखापत झालेली नाही.

जाहिरात

या व्हिडीओत जी व्यक्ती दोरीवर चालण्याचा प्रयत्न करत आहे, ती फ्रान्समध्ये राहणारी आहे. पाबलो सिगनोरेट असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्या इन्स्टाग्राम असेत खरतनाक करतब दाखवणारे व्हिडीओ आहेत. हे वाचा -  बापरे! एक छोटासा कोळीही इतका खतरनाक ठरू शकतो? भयंकर अवस्थेत महिला रुग्णालयात त्याने असे धडकी भरवणारे कारनामे करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे. 2018 साली सर्वात उंच दोरीवर डोळ्यांवर पट्टी बांधून चालण्याचा हा रेकॉर्ड आहे ( world’s longest highline walk between two mountains-blindfolded).  दोन डोंगरांच्या मध्ये दोरी बांधण्यात आली होती आणि डोळ्यांना पट्टी बांधून पाबलो त्यावरून चालला होता. ही दोरी 1,387 फूट उंचावर होती, ज्यावरून तो तब्बल 25 मिनटांपर्यंत चालला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात