लखनऊ 10 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद रेल्वे स्थानकावरून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या रेल्वे स्थानकावर एक महिला रेल्वे रुळ ओलांडत असताना ट्रेन येत होती, मात्र ती रुळावरच अडकली. यादरम्यान एक हायस्पीड ट्रेन रुळावर आली. रेल्वे कर्मचाऱ्याला हे दृश्य दिसताच ते धावत आले आणि महिलेला वरती खेचत तिचा जीव वाचवला. विद्येच्या मंदिरातील धक्कादायक VIDEO; प्रिन्सिपलने शाळेत विद्यार्थ्यांना जबरदस्ती करायला लावलं असं काम रेल्वे कर्मचाऱ्यानी आपल्या सतर्कतेने या महिलेचे प्राण वाचवले, पण पुढच्याच क्षणी व्हिडिओमध्ये दिसणारं दृश्य खूपच थक्क करणारं आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, आपला जीव वाचल्यानंतर ती महिला पुन्हा बाटली घेण्यासाठी ट्रॅकच्या दिशेने गेली. इतक्यात हायस्पीड ट्रेन अगदी आली. हे दृश्य बघायलाही खूप भीतीदायक होतं. मात्र, सुदैवाने ही हायस्पीड ट्रेन महिलेच्या फक्त जवळून गेली, तिला ट्रेनची धडक बसली नाही. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओही समोर आला आहे.
Firozabad, UP | We spotted a woman crossing the railway line as a train neared. While I ran from one end, another railway official ran from the other. He was able to get to her just in time. She was saved: GRP Constable, Shivlal Meena pic.twitter.com/t5XwvTyajQ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 9, 2022
व्हिडिओमध्ये एक महिला रेल्वे रुळावर अडकल्याचं दिसत आहे. यानंतर ती जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करू लागते. त्या महिलेचा आवाज तिथे चालत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना ऐकू आला. यानंतर एक रेल्वे कर्मचारी महिलेला वाचवण्यासाठी धावत आला. रेल्वे कर्मचाऱ्यानी अत्यंत सावधगिरीने महिलेला वरच्या बाजूला ओढून तिचे प्राण वाचवले. महिलेनं आपली बाटली रूळाच्या बाजूला ठेवली होती, ती घेण्यासाठी महिला पुन्हा तिथे गेली. इतक्यात हायस्पीड ट्रेन तिच्या अगदी जवळून गेली. 7 सप्टेंबरची मुंबईतील ‘ती’ अनपेक्षित 15 मिनिटं; प्रत्यक्ष दिसलं नाही ते कॅमेऱ्यात कैद; थक्क करणारा VIDEO हा संपूर्ण प्रकार रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रेल्वे पोलीस कर्मचारी शिवलाल मीना यांनी सांगितलं की, ही घटना सकाळी 11 च्या सुमारास घडली. रेल्वे रुळ ओलांडत असताना महिला तिथेच अडकली आणि ट्रेन आली. त्यांनीही महिलेला पाहिलं, पण ते दूर होते. ते महिलेला वाचवण्यासाठी जात होते, तोपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्याने धावत जाऊन महिलेला रेल्वे रुळावरून ओढलं.