जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी 21 तास पावसात गुडघ्यावर बसून राहिला तरुण, शेवटी...

गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी 21 तास पावसात गुडघ्यावर बसून राहिला तरुण, शेवटी...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

हा व्यक्ती 21 तास पावसात बसून राहिला. त्याची अशी इच्छा होती, की त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्या आयुष्यात परत यावं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 03 एप्रिल : एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी अतिशय विचित्र पद्धत वापरली. हा तरुण आपल्या गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी संपूर्ण रात्र तिच्या ऑफिसच्या बाहेर गुडघ्यावर बसून राहिला. यादरम्यान तिथे मुसळधार पाऊसही झाला, मात्र तो जागेवर उठला नाही. त्याच्या हातात फुलंही होती. तो दुपारच्या 1 वाजतापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत असाच बसून राहिला. आता ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नवरीला वरमाळा घालताच इतका घाबरला की स्टेजवरच मागे पळाला नवरदेव; पाहा नेमकं काय झालं? VIDEO ही घटना चीनच्या सिचुआन प्रांतातील आहे. घटनेचा व्हिडिओ चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर व्हायरल झाला आहे. याला 150 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्यक्ती 21 तास पावसात बसून राहिला. त्याची अशी इच्छा होती, की त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्या आयुष्यात परत यावं. पोलिसांसह आसपासच्या लोकांनी त्याला समजवण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र त्याने कोणाचंच ऐकलं नाही. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, जेव्हा हा व्यक्ती इथे बसलेला होता, तेव्हा त्याची गर्लफ्रेंड मात्र कुठेही दिसली नाही. तिथे असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की या व्यक्तीला अनेकांनी घरी जाण्याचा सल्ला दिला, मात्र तो निराश होऊन तिथेच बसून राहिला. यादरम्यान त्याची एक्स तिथे कुठेच दिसली नाही.

News18लोकमत
News18लोकमत

या व्यक्तीसोबत बोलल्यावर त्याने सांगितलं की त्याचं त्याच्या गर्लफ्रेंडसोबत काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झालं होतं आणि आता तो तिची माफी मागण्यासाठी आला आहे. त्याला आशा होती, की ती त्याला माफ करेल. त्याने लोकांना म्हटलं, की मला एकटं सोडा. मात्र दुसऱ्या दिवशी थंडी सहन न झाल्याने तो आपल्या घरी परत गेला. त्याची ही कथा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या. बहुतेकांनी हा तरुण चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. एका यूजरने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला सल्ला देत म्हटलं, की या मुलापासून लांबच राहा. तर एकाने म्हटलं की, हे प्रेम नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात