जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नवरीला वरमाळा घालताच इतका घाबरला की स्टेजवरच मागे पळाला नवरदेव; पाहा नेमकं काय झालं? VIDEO

नवरीला वरमाळा घालताच इतका घाबरला की स्टेजवरच मागे पळाला नवरदेव; पाहा नेमकं काय झालं? VIDEO

नवरीला वरमाळा घालताच इतका घाबरला की स्टेजवरच मागे पळाला नवरदेव; पाहा नेमकं काय झालं? VIDEO

नवरदेव नवरीला वरमाळा घालत असतानाच स्टेजवर जोरदार धमाका झाल्याचा आवाज येतो, जो ऐकून नवरदेवाला धक्का बसतो आणि तो घाबरलेला दिसतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 03 एप्रिल : सध्या लग्नांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे लोकांची सोशल मीडिया फीड लग्नाच्या व्हिडिओंनी भरलेली आहे. तुम्ही इंटरनेटवर असे व्हिडिओ देखील पाहिले असतील ज्यामध्ये वधू किंवा वराला त्यांचे मित्र-मैत्रिणीच त्रास देताना दिसतात. मात्र, कधीकधी या मजेदार खोड्या वाईट अनुभवात बदलतात. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू आणि वर ‘जयमाला’ विधी करताना दिसत आहेत. क्रीम रंगाची शेरवानी आणि लाल पगडी घातलेला वर वधूला हार घालताना दिसतो. नवरदेवाला कल्पना नव्हती की त्याच्या मित्रांनी सर्वात योग्य क्षणी त्याची खोड काढण्याचा प्लॅन आखला होता. नवरदेव नवरीला वरमाळा घालत असतानाच स्टेजवर जोरदार धमाका झाल्याचा आवाज येतो, जो ऐकून नवरदेवाला धक्का बसतो आणि तो घाबरलेला दिसतो.

जाहिरात

व्हिडिओ पाहून असं वाटतं,की फटाक्याचा आवाज ऐकून नवरदेव कन्फ्यूज झाला आणि त्याला वाटलं की हा गोळी झाडल्याचा आवाज आहे. हे दृश्य पाहून लग्नातील पाहुणे आणि घरातील लोक मात्र हसताना दिसतात. यानंतर आपल्या मित्रांच्या या कृत्यामुळे नवरदेव भडकला असल्याचं जाणवतं आणि तो यासाठी आपल्या मित्रांना सुनावतो. पाहताच नवरदेवाने शरमेने बंद केले डोळे, नवरीही स्तब्ध; भरमंडपात स्क्रिनवर दिसला त्यांचा Private Video हा व्हिडिओ _naughtyfamily नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. बातमी लिहिपर्यंत तो 8.6 दशलक्ष वेळा पाहण्यात आला आहे. हा अनोखा प्रँक नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरत आहे. एका वापरकर्त्याने म्हटलं, “बिचाऱ्याचा पोपट झाला” दुसर्‍याने गंमतीने लिहिलं “नवरदेव घाबरला, नवरदेव घाबरला.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं “भाई को लगा की आशिक फायर कर दिया.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात