सिंहाला पाहून पळत होता; जंगलाच्या राजाने झेप घेत मागून पंजात पकडलं आणि... VIDEO VIRAL

सिंहाला पाहून पळत होता; जंगलाच्या राजाने झेप घेत मागून पंजात पकडलं आणि... VIDEO VIRAL

सिंहापासून (man running away from lion) दूर पळणारी ही व्यक्ती अखेर सिंहाच्या तावडीत सापडते.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : सिंह (Lion) म्हटलं तरी हृदयात धडकी भरते. असा सिंह समोर आलं तर काय होईल हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. अवघ्या काही  क्षणात तो आपली शिकार पकडतो आणि फस्त करतो. अगदी झेप घेत तो अचकूपणे आपला निशाणा साधतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती सिंहापासून दूर (Man ruuning away from lion) पळत होता. त्यानंतर सिंहाने मागून येत त्याला धरलं (Lion attacked on man) आणि पुढे काय घडलं ते तुम्ही व्हिडीओतच (Lion video) पाहा.

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती सिंहाला पाहताच पळू लागतो. सिंहसुद्धा त्याच्या मागे धावतो. व्यक्ती पळत असतो तेव्हा सिंह उंच झेप घेतो आणि त्याला मागून धरतो. आपल्या पुढील दोन्ही पंजात तो व्यक्तीला मागून धरतो.

african_animal या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे.

हे वाचा - OMG! बोटीतून समुद्रात पडला तो थेट Whale च्या जबड्याजवळ; पुढे काय घडलं पाहा VIDEO

आता काही ही व्यक्ती सिंहाच्या तावडीतून सुटत नाही. पण व्हिडीओत थोडं आणखी पुढे गेल्यानंतर उलट तुम्हालाच धक्का बसेल. कारण हा सिंह त्या व्यक्तीची शिकार करत नाही. आता या सिंहाने व्यक्तीची शिकार का केली नाही? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर काही मोजके लोक असतात ज्यांची अशी हिंस्र, जंगली प्राण्यांसोबतही मैत्री असते. फिल्ममध्ये तर तुम्ही पाहिलंच असेल. पण प्रत्यक्षात अशी अनोखी यारी पाहायला मिळते.

हे वाचा - VIDEO - ऑफिसमध्येच धू धू धुतलं; आंबटशौकिन बॉसला महिलेने घडवली चांगलीच अद्दल

ही व्यक्ती म्हणजे सिंहाची देखभाल घेणारी त्यांची काळजी घेणारी आहे. म्हणून सिंहाने त्याची शिकार केलेली नाही. तर उलट तो त्याच्यासोबत  मस्ती करतो आहे. माणसांनी पकडापकडी खेळावी तशी हा सिंह पकडापकडी खेळतो आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

Published by: Priya Lad
First published: April 15, 2021, 8:54 PM IST

ताज्या बातम्या