• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • VIDEO - ऑफिसमध्येच धू धू धुतलं; आंबटशौकिन बॉसला महिलेने घडवली चांगलीच अद्दल

VIDEO - ऑफिसमध्येच धू धू धुतलं; आंबटशौकिन बॉसला महिलेने घडवली चांगलीच अद्दल

महिलेने बॉसच्या केलेल्या धुलाईचा (woman in china beat her boss) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

 • Share this:
  बीजिंग, 15 एप्रिल : रस्त्यावर कुणी छेड काढली तर त्याची धुलाई झाल्याचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण असं गैरतवर्तन करणाऱ्या बॉसची धुलाई तीसुद्धा ऑफिसमध्ये. बहुतेक महिला कर्मचारी बॉसविरोधात बोललं तर आपल्या नोकरीचं काय होईल किंवा भविष्यात आपल्या कोणत्या संकटाला सामोरं जावं लागेल या भीतीनेच निमूटपणे सर्व सहन करत असतात. त्यामुळे आता ऑफिसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे. कायदेसुद्धा कठोर करण्यात आले आहेत. तरीसुद्धा काही महिला व्यक्त होत नाही. पण चीनमधील एका महिलेने मात्र अशा बॉसला स्वतःच चांगलीच अद्दल (woman in china beat her boss) घडवली आहे. चीनमधील (China) महिलेने आपल्या आंबटशौकिन बॉसला चांगलीच अद्दल घडवली आहे. तिने चक्क ऑफिसमध्येच जाऊन त्याला धू धू धुतलं आहे. बॉसच्या केबिनमध्ये जाऊन महिलेने चांगलाच तांडव केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता, एक महिला एका केबिनमध्ये जाते आणि खुर्चीवर बसलेल्या बॉसला मारायला सुरुवात करते. त्याच्यावर काही वस्तू, पुस्तकं फेकून मारते, त्याच्यावर पाणी फेकते. इतकंच नाही तर ती मॉप घेते आणि त्याला सटासट मारते. तिचा मार खाणारा बॉस मात्र तिच्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. गप्पपणे खुर्चीतच बसून राहतो, तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं तोंड लपवण्याचाही प्रयत्न करतो. हे वाचा - न्हाव्याने आधी मित्राचे केस कापले नंतर...; VIDEO पाहताच तुम्हालाही बसेल धक्का मीडिया रिपोर्टनुसार ही घटना चीनच्या हेईलाँगजियांग प्रांतातील आहे. हे महिला एका सरकारी कार्यालयात काम करते. तिचा बॉस तिला अश्लील मेसेज पाठवत होता. त्याने तिला तीन वेळा अश्लील मेसेज पाठवले. शिवाय ऑफिसमधील इतर महिलांसोबतसुद्धा तो फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण या महिलेचा संयम सुटला. बॉसच्या अश्लील मेसेजला ती वैतागली आणि तिने त्याला धडा शिकवला. हे वाचा - Shocking! चक्क मगरींनाच खाजवायला गेली; जबड्याजवळ हात नेला आणि... हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी महिलेचं समर्थन केलं आहे. महिलेने जे केलं ते योग्यच केलं असं म्हणत बहुतेकांनी तिला पाठिंबा दिला. तर तिच्या या आंबटशौकिन बॉसवर कारवाई करण्यात आली आहे. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
  Published by:Priya Lad
  First published: