जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - अंगावर आलेल्या खतरनाक सापाला मांजरीने धरलं तोंडात; कचाकचा चावलं शेवटी...

VIDEO - अंगावर आलेल्या खतरनाक सापाला मांजरीने धरलं तोंडात; कचाकचा चावलं शेवटी...

साप आणि मांजरीची खतरनाक फायटिंग.

साप आणि मांजरीची खतरनाक फायटिंग.

साप आणि मांजरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 11 फेब्रुवारी :  साप आणि मुंगूस, मांजर आणि उंदीर हे एकमेकांचे कट्टर शत्रू. सामान्यपणे या प्राण्यांची फायटिंग तुम्ही पाहिले असेल. प्राण्यांच्या लढाईचे, शिकारीचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण कधी खतरनाक साप आणि मांजराला एकमेकांसोबत लढताना पाहिलं आहे का? या लढाईत कोणं जिंकेल असं तुम्हाला विचारलं तर साहजिकच साप असंच तुम्ही म्हणाल. पण मांजर आणि साप एकमेकांसमोर आल्यावर नेमकं काय घडू शकतं, हे दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. मांजर आणि सापामध्ये खतरनाक फायटिंग झाली आहे. शांत बसलेल्या साध्याभोळ्या मांजरीशी खतरनाक सापाने पंगा घेतला. पण तो त्यालाच भारी पडला. मांजरीवर हल्ला करण्यासाठी साप तिच्या अंगावर गेला. त्याने मांजरीच्या मानेभोवती वेटोळा घातला. शेवटी मांजर भित्री असली तरी तिला वाघाची मावशी म्हटलं जातं हे विसरून चालणार नाही. तिने आपलं हे रूप दाखवलंच. हे वाचा -  खतरनाक किंग कोब्राला वाचवायला गेला तरुण, विहिरीत उतरताच…; अंगावर काटा आणणारा VIDEO जसा साप तिच्या मानेवर आला तसं तिनेही त्याचा प्रतिकार करायला सुरूवात केली. सापाने मांजरीभोवती आपली शेपटी गुंडाळली आणि तिला दंश करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी मांजर त्याच्यावर आपले पाय मारत होती. मांजरीनेही या सापाला एकदम कडी टक्कर दिली. शेवटी सापाच्या विळख्यातून आपण काही सुटत नाही आहोत, याची कल्पना होताच तिने आपला शेवटचा डाव टाकला.

News18लोकमत
News18लोकमत

तिने थेट सापाचं तोंड आपल्या तोंडात धरलं आणि उंदराला चावावं तसं ती चक्क या सापाला चावू लागली. सापाला तिनं असं धरलं की साप तिच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडत होता पण त्याला ते काही शक्य झालं नाही. हे वाचा -  OMG! मांजरीची शिकार करायला आला खतरनाक साप, वाघाच्या मावशीने त्याचीच लावली वाट; Watch Video शिकार करायला आलेला सापच मांजरीचा शिकार झाला. मांजरीने शिकारीचा डाव काही क्षणात पूर्णपणे उलटून लावला. याआधी असा व्हिडीओ कदाचित तुम्ही कधीच पाहिला नसेल.

जाहिरात

bilal.ahm4d इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात