मराठी बातम्या /बातम्या /Viral /खतरनाक किंग कोब्राला वाचवायला गेला तरुण, विहिरीत उतरताच...; अंगावर काटा आणणारा VIDEO

खतरनाक किंग कोब्राला वाचवायला गेला तरुण, विहिरीत उतरताच...; अंगावर काटा आणणारा VIDEO

किंग कोब्रासारख्या खतरनाक सापाला वाचवण्यासाठी तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावली.

किंग कोब्रासारख्या खतरनाक सापाला वाचवण्यासाठी तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावली.

किंग कोब्रासारख्या खतरनाक सापाला वाचवण्यासाठी तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 04 फेब्रुवारी : एखाद्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे लोक तसे कमीच. त्यातही प्राण्यांना वाचवणारे फारच कमी. अशात तो प्राणी किंग कोब्रा साप असेल तर... त्याला वाचवण्याची फक्त कल्पना करूनच तुम्हाला घाम फुटला ना? त्याच्या जवळ जाण्याची हिंमतच कुणी करणार नाही. कारण ज्याचा आपण जीव वाचवणार त्याच्यापासूनच आपल्याला धोका आहे, हे माहिती असल्याने   या खतरनाक, विषारी प्राण्याला वाचवण्यासाठी आपला जीव कोण कशाला धोक्यात टाकेल. पण एका तरुणाने ती डेअरिंग केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

एका तरुणाने किंग कोब्रासारख्या खतरनाक सापाला वाचवण्याचा प्रयत्न केला. हा साप पाण्याने भरलेल्या विहिरीत पडला होता. त्याला वाचवण्यासाठी म्हणून तरुणही त्या विहिरीत गेला. पण विहिरीत उतरताच जे घडलं ते पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सापाच्या रेस्क्यूचे तसे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण हा व्हिडीओ खूप भयंकर आहे.

हे वाचा - चक्क सापाला KISS करायला गेला तरुण; असा चावला की... थरकाप उडवणारा VIDEO

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कमरेला दोरी बांधून तरुण विहिरीत उतरला आहे. त्याने आपले दोन्ही पाय विहिरीच्या भिंतीला लावले आहेत आणि फक्त दोरीच्या सहाय्याने तो वर राहिला आहे. त्याने एका हातात काळ्या रंगाची पिशवी धरली आहे आणि दुसऱ्या हातात किंग कोब्रा सापाची शेपटी.

सापाला तो त्या पिशवीत टाकण्याचा प्रयत्न करतो. पण काही केल्या साप आत जा नाही. सापाचं तोंड त्या पिशवीजवळ जातं आणि साप आता आत जाणार असं तरुणाला वाटतं. तोच साप पुन्हा मागे हटतो. असं किती तरी वेळ चालतं. साप त्या तरुणावर हल्ला करण्याचाही प्रयत्न करतो. शेवटी तरुणाच्या हातून सापाची शेपटी सुटते. आता या तरुणाचे प्रयत्न अयशस्वी होतात की काय? साप पाण्यात पडतो की काय असं वाटतं. पण सुदैवाने त्याच वेळी तो ती पिशवी पुढे करतो आणि साप बरोबर त्यातच पडतो.

हुश्श! साप पकडणाऱ्या त्या तरुणाच्या आणि त्याला साप पकडताना पाहणारे आपण सर्वांच्या जीवात जीव येतो. बरीच मेहनत आणि प्रयत्नानंतर अखेर सापाला पकडण्यात यश येतं.

हे वाचा - अजगर आणि तो...; तिच्यासोबत भांडणानंतर तरुणाने गाठला विकृतीचा कळस; पाहून पोलीसही हादरले

हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. official_sarpmitra12 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

सापाला वाचवण्यासाठी या तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांना धडकी भरली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos, Wild animal