ट्युब इंडियन इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. गिफ्ट असावं तर असं असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हे वाचा - पुन्हा डोकं फिरवायला आली ढिंच्याक पूजा; तिच्या नव्या गाण्याचा VIDEO पाहिलात का? व्हिडीओत पाहू शकता एका लाल रंगाच्या सोनेरी पेपरमध्ये गिफ्ट रॅप केलेलं आहे. अगदी छान असं पॅकिंग केलेलं हे गिफ्ट. पाहताच आपल्यालाही यात काहीतरी सुंदर भेट असेल असंच वाटतं. हा लाल रंगाचा रॅप काढल्यानंतर आत एक सुंदर बॉक्स आहे. हा बॉक्स खोलल्यानंतर त्यातून बरेच कागद निघतात. त्याच्यामध्ये आणखी एका रॅपरमध्ये दंडगोल आकाराचं काहीतरी गुंडाळलेलं दिसतं आहे. हा रॅपर हटवताच पाहतो तर काय? व्यक्तीने उत्सुकेपोटी इतक्या भरभर गिफ्ट खोलल्यानंतर त्यातून काय निघालं पाहिलंत का? तो चक्क एक टिश्यू रोल आहे. हे वाचा - आंदोलन, संप नाही तर थेट जेसीबी आणला आणि...; पगारासाठी कर्मचाऱ्याने काय केलं पाहा गिफ्ट पाहून तुम्हीही हैराण झाला असाल. पण तुम्हाला तितकंच हसूही आलं हो ना. नेटिझन्सना हे गिफ्ट सॉलिड आवडलं आहे. खरंतर असं गिफ्ट देण्यास हरकत नाही, अशीच प्रतिक्रिया बहुतेकांनी दिली आहे. काय मग तुमचं काय मत आहे? तुम्हीही कुणाला असं हटके गिफ्ट देण्याच्या तयारीत असाल तर ही आयडिया चांगली आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Viral, Viral videos