जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आंदोलन नाही, संप नाही तर थेट जेसीबी आणला आणि...; पगारासाठी कर्मचाऱ्याने काय केलं पाहा VIDEO

आंदोलन नाही, संप नाही तर थेट जेसीबी आणला आणि...; पगारासाठी कर्मचाऱ्याने काय केलं पाहा VIDEO

आंदोलन नाही, संप नाही तर थेट जेसीबी आणला आणि...; पगारासाठी कर्मचाऱ्याने काय केलं पाहा VIDEO

बॉसने पगार देण्यास नकार दिला आणि कर्मचारी संतप्त झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 सप्टेंबर : पगारासाठी कर्मचारी आंदोलन करतात, संप करतात पण एका कर्मचाऱ्याने मात्र पगारासाठी असं काही केलं आहे, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. बॉसने (Boss) सॅलरी (Salary) देण्यास नकार देताच कर्मचाऱ्याची सटकली आणि त्यानंतर कर्मचाऱ्याने थेट जेसीबीच आणला. पुढे काय घडलं तुम्हीच पाहा (When the Boss refuses to pay). संतप्त कर्मचाऱ्याचा व्हिडीओ म्हणून एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती जेसीबी घेऊन येते आणि तिथं रांगेत उभ्या असलेल्या गाड्या उद्ध्वस्त करून टाकतो. त्याला असं करताना पाहून लोक तिथं धावत येतात.

जाहिरात

त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण तो कुणाचंच ऐकत नाही. काही वेळाने लोक त्याला पकडतात आणि त्याला असं करण्यापासून रोखतात. हे वाचा -  “Work From Home बंद करा, नाहीतर आमचा संसार मोडेल”; हर्ष गोयंकांना महिलेची विनंती @CrazyFunnyVidzz ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. बॉसने सॅलरी देण्यास नकरा दिल्यानंतर असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओचा संबंध बॉस, कर्मचारी आणि पगाराशी जोडला जातो आहे. पण खरंच या व्हिडीओमागे खरं काय आहे, ही व्यक्ती असं का करते आहे हे माहिती नाही. हे वाचा -  रस्त्यावर चालता चालताच हजामत; सायकलवरील फिरत्या सलूनचा VIDEO पाहिलात का? हा व्हिडीओ अनेक नेटिझन्सना आवडला आहे. त्यावर तशाच प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात