Home /News /viral /

पुन्हा डोकं फिरवायला आली Dhinchak Pooja; तिच्या नव्या गाण्याचा VIDEO पाहिलात का?

पुन्हा डोकं फिरवायला आली Dhinchak Pooja; तिच्या नव्या गाण्याचा VIDEO पाहिलात का?

ढिंच्याक पूजा म्हणजे पूजा जैन तिचं नवं गाणं (Dhinchak Pooja latest song) घेऊन आली आहे.

    मुंबई, 16 सप्टेंबर :  'सेल्फी मैंने ले ली आज', 'स्वैग वाली टोपी..', 'दिलों का शूटर है मेरा स्कूटर' अशा अनेक गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी ढिंच्याक पूजा (Dhinchak Pooja) आता तुमचं डोकं खाण्यासाठी पुन्हा परतली आहे (Dhinchak Pooja song video). ढिंच्याक पूजा म्हणजे पूजा जैन तिचं नवं गाणं आणलं आहे (Dhinchak Pooja latest new song). आपल्या विचित्र गाण्यांनी सोशल मीडियावर स्टार झालेली पूजा. तिचं गाणं ऐकून सर्वजण डोकंच धरतात. गेले काही दिवस ती गायब होती. पण आता एका नव्या गाण्यासह ती परतली आहे. हे गाणं ऐकूनही तुम्ही डोक्याला हात लावाल. 15 सप्टेंबरला पूजाने आपल्या युट्यूब चॅनेलवर हे गाणं रिलीज केलं आहे. 14 सप्टेंबरला तिने या आपल्या या गाण्याची घोषणाही केली होती. हे गाणं पाहायला विसरू नका, असं आवाहन तिनं केलं होत. पूजाचं नवं गाणं आहे जाऊं मैं प्लेन मे. पूजाच्या इतर गाण्याप्रमाणे आता हे गाणंसुद्धा चर्चेत आहे. हे गाणं ऐकून त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. हे वाचा - हे काय नवीन? ट्रॅफिक सिग्नलवर अचानक मॉडेलने सुरू केला डान्स, पाहा VIRAL VIDEO मार्चमध्ये पूजाने कोरोनाशी संबंधित गाणंही तयार केलं होतं. होगा ना करोना हे  हे गाणं तिने  19 मार्चला आपल्या ऑफिशिअल युट्यूब पेजवर अपलोड केलं होतं. हे गाणं केवळ जनजागृतीच्या हेतूनं तयार करण्यात आल्याचं डिस्क्लेमरमध्ये म्हटलं होतं. आपल्या विचित्र गाण्यांमुळे  एक सर्वसामान्य मुलगीही एका रात्रीत स्टार बनली. 'दिलो का शुटर है मेरा स्कुटर' या नवीन गाण्यावरून ती ट्रोलही झाली. या गाण्यात ती व्हेस्पा स्कुटर चालवताना दिसते. पण गंमत अशी की या गाण्यात स्कुटर चालवताना तिनं हेल्मेट घातलंच नाही.त्यात दिल्लीच्या रस्त्यावर ती मोठ्यामोठ्यानं गाणी म्हणत दंगा ही करतेय. हीच बाब ध्यानात घेऊन मोहित सिंह नावाच्या गृहस्थांनी दिल्ली पोलिसांकडे ट्विटरवर ट्विट करून तक्रार केली  होती. हे वाचा - लग्नानंतर नवरा-नवरी झाले आऊट ऑफ कंट्रोल; भररस्त्यातच घातला धिंगाणा; VIDEO VIRAL सोशल मीडियावर ढिंचॅक पूजा म्हणून प्रसिद्ध झालेली तिला इतकी प्रसिद्धी मिळाली होती की, तिला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Social media, Viral, Viral videos

    पुढील बातम्या